क्रीडा

विजयकडून जॉर्जियाचा पैलवान चित

सकाळवृत्तसेवा

विटा - आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महादंगलीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (पुणे) याने जॉर्जियाच्या टेडोरे लेब्नॉईझे (जॉर्जिया) याला घिसा डावावर अस्मान दाखवत सात लाखांचे बक्षीस जिंकले. 

द्वितीय क्रमांकासाठी सहा लाखाच्या दोन कुस्त्या झाल्या. त्यात महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने परवेझ दिल्ली याला पोकळ घिसा डावावर चितपट करत कुस्ती जिंकली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवने भारत केसरी कमलजीत सिंगला घिसा डावावर चित केले. पाच लाख इनामाच्या कुस्तीत राहुल आवाराने सोनू कुमारला हप्ता डावावर पराभूत केले. दोन लाख इनामाच्या कुस्तीत माऊली जमदाडेने मथुरेच्या उमेशकुमारला घिसा डावावर चित केले. 

दीड लाखाच्या दोन कुस्त्या झाल्या. त्यात भारत मदनेने हप्ता डावावर कौतुक डाफळेला अस्मान दाखविले. योगेश बोंबाळेला संतोष दोरवडने घुटना डावावर पराभूत करत विजय मिळविला. 
या मुख्य लढतींसह लहान-मोठ्या अनेक चटकदार कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कुस्ती मैदानात हजारो शौकीनांनी हजेरी लावली. हलगीच्या कडकडाटात मल्लांना प्रोत्साहन दिले जात होते. 

 आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, अभिजीत कदम, सयाजी बाबर, अमर शितोळे, किरण पाटील, दिलीप किर्दत, भारत पवार, तानाजी बाबर, शहाजी पाटील उपस्थित होते.  संयोजन चंद्रहार पाटील यांनी केले. निवेदन शंकर पुजारी, परशुराम पवार, सुरेश गवळी, जोतीराम वाझे यांनी केले. पंच म्हणून हणमंत जाधव पुणदीकर, काका पवार यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT