IOA clears men's handball team for event after Allahabad High Court intervention
IOA clears men's handball team for event after Allahabad High Court intervention 
क्रीडा

न्यायालय हस्तक्षेपामुळे हॅंडबॉल संघ एशियाडला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अलाहाबाद सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे भारतीय ऑलिंपिक संघटनेने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष हॅंडबॉल संघाची प्रवेशिका पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजकांनी संघाची प्रवेशिका अद्याप स्वीकारलेली नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हॅंडबॉल संघास आशियाई क्रीडा स्पर्धेस पाठवण्याचा निर्णय दिला आहे. "न्यायालयाच्या निर्णयाचा भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कायदे समितीने अभ्यास केला. त्यांनीही संघ पाठवण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही हॅंडबॉल संघाची प्रवेशिका पाठवली आहे,' असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले. भारतीय ऑलिंपिक संघटनेने या महिन्याच्या सुरवातीस जाहीर केलेल्या संघात महिला हॅंडबॉल संघास मंजुरी देताना पुरुष संघाचा समावेश केला नव्हता; मात्र या स्पर्धेच्या ड्रॉमध्ये भारताचा समावेश करण्यात आला.

आशियाई हॅंडबॉल महासंघाने याबाबतची माहिती भारतास कळवली. त्यानंतरही भारतीय ऑलिंपिक संघटनेने मंजुरी न दिल्याने हॅंडबॉल संघटनेने न्यायालयात याचिका सादर केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT