RRvs CSK, Rajasthan vs Chennai
RRvs CSK, Rajasthan vs Chennai  
क्रीडा

राजस्थानचा चेन्नईवर 'हल्ला बोल' विजय सॅमसन, स्मिथ आणि आर्चरची टोलेबाजी ठरली निर्णायक

सकाळ ऑनलाईन

शारजा : "हल्ला बोल' अशी आयपीएलमध्ये टॅग लाईन असलेल्या राजस्थान रॉयल्सने महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई संघावर अक्षरशः हल्ला बोलच केला, तब्बल 17 षटकार आणि 9 चौकारांची आतषबाजी करत द्विशतकी धावा उभारल्या आणि 16 धावांनी आपला सलामीचा सामना जिंकला.  संजू सॅमसन, स्टीव स्मिथ आणि जोफ्रा आर्चर या तिघा फलंदाजांनी ही वादळी टोलेबाजी केली त्यामुळे राजस्थानने 216 धावा केल्या. चेन्नईने जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, फाफ डुप्लेसीनेही 36 चेंडूत 72 धावांचा घणाघात सादर केला, पण अखेर सरशी राजस्थानचीच झाली. आर्चरने डुप्लेसीला बाद केले आणि त्यानेच फलंदाजी करताना अखेरच्या षटकात फटकावलेल्या 30 धावा सामन्याचा निकाल स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. 

सॅमसन-स्मिथची शतकी भागीदारी
जोस बटलर आणि बेन स्टोक्‍स अशा दिग्गज फलंदाजांच्या अनुपस्थितीत राजस्थानची फलंदाजी कमकूवत वाटत होते, परंतु मैदानात उतरल्यावर त्यांनी यंदाच्या मोसमातील पहिली द्विशतकी धावसंख्या उभारली. संजू सॅमसन सुरुवातीपासून भलत्याच मूडमध्ये होता. नैत्रदीपक षटकांची माळ त्याने ओवळण्यास सुरुवात केली. कर्णधार स्टीव स्मिथलाही लय सापडली त्यानेही तेवढाच आक्रमक हल्ला चेन्नईच्या गोलंदाजांवर चढवला या दोघांनी शतकी भागीदारी केली. 

राजस्थान द्विशतकी धावा उभारणार हे निश्‍चित वाटत होते, परंतु सॅमसन आणि स्मिथ बाद झाल्यावर राजस्थानची मधली फळी अपयशी ठरली परंतु, नवव्या क्रमांकाचा फलंदाज जोफ्रा आर्चरने एन्गिडीच्या अखेरच्या षटकांत तब्बल 30 धावांची लयलूट केली. 

धोनीचा स्टेडियमच्या बाहेर षटकार 
चेन्नईचा पराभव निश्‍चित झालेला असला तरी धोनीने हार स्वीकारली नव्हती त्याने करनच्या अखेरच्या षटकात तीन षटकार मारले त्यातील एक षटकार तर स्टेडियमच्या बाहेर रस्त्यांवर गेला. 

संक्षिप्त धावफलक : राजस्थान : 20 षटकांत 7 बाद 216 (स्टीव स्मिथ 69 -47 चेंडू, 4 चौकार, 4 षटकार, संजू सॅमसन 74 -32 चेंडू, 1 चौकार, 9 षटकार, जोफ्रा आर्चर नाबाद 27 -8 चेंडू, 4 षटकार, सॅम करन 33-3, एन्गिडी 56-1, चावला 55-1). चेन्नई ः 20 षटकांत 6 बाद 200: (शेन वॉटसन 33 -21 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, फाफ डुप्लेसी 72 - 37 चेंडू, 1 चौकार 7 षटकार, सॅम करन 17 -6 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, धोनी नाबाद 29 -17 चौकार, 3 षटकार, आर्चर 26-1, तेवाटिया 37-3,)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT