ms dhoni and pant Sakal Media
क्रीडा

IPL 2021 : अनुभवी CSK ला युवा DC नं एकतर्फी मारलं

सकाळ डिजिटल टीम

IPL 2021 CSK vs DC : शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर युवा जोश असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जला सहज पराभूत केले. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सात गडी आणि 8 चेंडू राखून विजय नोंदवला. पंतच्या नेतृत्वाची दमदार सुरुवात करण्यासाठी धवन आणि पृथ्वीने दाखवलेला शो उपयुक्त ठरला.  

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सार्थ ठरवला. आवेश खान याने सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडल्यानंतर सुरेश रैनाचे अर्धशतकी खेळी करुन डाव सावरला. अखेरच्या टप्प्यात रविंद्र जडेजा आणि सॅम कुरेन यांनी उपयुक्त खेळी करत निर्धारित 20 षटकात 6 बाद 188 धावांपर्यंत मजल मारली होती. 

या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. पृथ्वी शॉने 38 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यात त्याने 9 चौकार आणि 3 षटकार खेचले. ब्रावोने त्याची विकेट घेतली त्यावेळी खूप उशीर झाला होता. धवन 54 चेंडूत 85 धावा करुन माघारी फिरला, शार्दुल ठाकूरने त्याला बाद केले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार खेचले. स्टॉयनिस 9 चेंडूत 14 धावा करुन परतला. युवा कर्णधार रिषभ पंतने चौकार खेचून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.  भारत भारत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT