Punjab-Kings-IPL 
क्रीडा

IPL 2021: पंजाबच्या संघाने ताफ्यात आणला इंग्लंडचा स्टार खेळाडू

विराज भागवत

ऑस्ट्रेलियाच्या रिचर्डसनला पर्याय म्हणून केली निवड

IPL 2021 in UAE: कोरोनाच्या (Coronavirus) तडाख्यामुळे अर्ध्यातच थांबवलेली IPL स्पर्धा १९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंनी आपली उपलब्धता (Availability) कळवली आहे. पण काही खेळाडूंनी मात्र यातून वैयक्तिक (Personal Reasons) कारणास्तव माघार घेतली आहे. पंजाबच्या (Punjab Kings) संघातील वेगवान ऑस्ट्रेलियन गोलंदाजी झाय रिचर्डसन (Jhye Richardson) याने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे त्याच्या संघात इंग्लंडचा स्टार फिरकीपटू आदिल रशीद (Adil Rashid) याला स्थान देण्यात आले आहे. पंजाबच्या संघाने आपल्या ट्वीटर (Twitter) हँडलवरून ही घोषणा केली.

झाय रिचर्डसन याला पंजाबच्या संघाने १४ कोटींची बोली लावून विकत घेतले होते. पण त्याने फारशी चांगली कामगिरी केली नाही. आता युएईमध्ये होणाऱ्या IPLच्या उर्वरित सामन्यांसाठी त्याने माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागी रशिदला संघात स्थान देण्यात आले आहे. रशिदने अनेकदा लिलावासाठी आपले नाव नोंदवले होते, पण त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. असे असताना रिचर्डसनची अनुपस्थिती ही रशिदसाठी एक प्रकारची संधीच ठरणार आहे.

आदिल रशिदने आतापर्यंत विविध लीग स्पर्धा आणि इंग्लंडकडून खेळताना २०१ टी २० सामन्यांत २३२ बळी टिपले आहेत. इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना त्याच्या नावावर ६५ टी २० बळी आहेत. त्यामुळे पंजाबला त्याच्या समावेशाचा किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT