tabraiz shamsi  twitter
क्रीडा

IPL 2021 : राजस्थानच्या संघात 'रॉयल' गोलंदाजाची एन्ट्री

दुसऱ्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.

सुशांत जाधव

IPL 2021 In UAE : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सर्व सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. यासाठी फ्रेंचायझी संघांनी संघ बांधणीला सुरुवात केलीये. वेगवेगळ्या संघातील काही खेळाडूंनी उर्वरित स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर रिप्लेसमेंट खेळाडूंनी टीमचे संतुलन कायम ठेवण्यासाठी संघ प्रयत्नशील आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने बुधवारी टी-20 मधील टॉप क्लास बॉलरला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. दुसऱ्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटूची अँड्रू टायच्या जागी बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीये.

आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला तरबेज आयपीएलमध्ये यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसला होता. 2016 च्या हंगामात त्याला 4 सामन्यात संधीही मिळाली. यात त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटूने आयसीसीच्या टी -20 क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी ठरलाय. 792 पॉइंटसह तो क्रमवारीत अव्वलस्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून त्याने 39 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्याने 45 विकेट घेतल्या आहेत. 33 धावा खर्च करुन 4 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. आयपीएलमधील उर्वरित सामन्यात राजस्थानकडून त्याला किती सामन्यात संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पहिल्या टप्प्यातील 29 सामन्यानंतरच्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पाचव्या स्थानावर आहे. 7 पैकी 3 सामन्यात विजय आणि 4 सामन्यातील पराभवासह त्यांच्या खात्यात 6 गुण जमा आहेत. उर्वरित सामन्यातील दिमाखदार खेळीनं प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरले. नव्या स्टार गोलंदाजाचा त्यांना कितपत फायदा होणार हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य ग्रंथ दिंडी

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT