क्रीडा

IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

आज रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी हा सामना नियोजित होता, पण...

विराज भागवत

IPL 2021 RCB vs KKR : सध्या सुरू असलेल्या IPLच्या हंगामात आज विराटच्या बंगळुरूचा मॉर्गनच्या कोलकाताशी सामना होणार होता. मात्र हा सामना रद्द करण्यात आला असून सामना आता पुढे ढकलण्यात आला आहे. आता बंगळुरू-कोलकाता सामना कधी खेळवला जाईल, हे IPL व्यवस्थापन लवकरच जाहीर करेल. हा सामना कदाचित काही दिवसांनी खेळवला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. सामना आज खेळवला जाणार नसल्याची माहिती 'पीटीआय'ने दिली आहे.

कोलकाता संघाचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने कोलकाताच्या संघामध्ये काहीसं अस्वस्थ वातावरण आहे. वरूण आणि संदीप यांच्यासोबत असलेल्या इतर खेळाडूंना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित आजचा सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

IPL ही स्पर्धा बायो-बबलमध्ये खेळवली जाते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव बायो-बबलमध्ये होणं ही खूपच धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. "कोलकाताचा वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर बंगळुरूच्या संघात काहीशी अस्वस्थता होती. त्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात येणार", असा अंदाज BCCI च्या अधिकाऱ्याने वर्तवला होता. त्यानुसार, अखेर आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोलकाताचा पॅट कमिन्स याची प्रकृतीदेखील थोडी खराब असल्याची चर्चा आहे. कोलकाताचा शेवटचा सामना दिल्लीसोबत झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

Krishnaraj Mahadik Political Journey : स्पोर्ट्समन, युट्यूबर ते राजकारणी खासदार धनंजय महाडिक पुत्र कृष्णराजचा राजकीय प्रवास

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT