wriddhiman saha e sakal
क्रीडा

IPL 2021: साहानं केली 'बायो-बबल'ची पोलखोल!

आयपीएल स्पर्धेदरम्यान 4 मे रोजी साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याचा रिपोर्ट समोर आल्यानंतरच बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

सुशांत जाधव

टीम इंडियाचा अनुभवी विकेट किपर वृद्धिमान साहाने आयपीएल स्पर्धेतील बायो-बबलवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामात निर्माण करण्यात आलेले बायोबबलचे वातावरण हे युएईतील स्पर्धेच्या तुलनेत कमवूकत होते, असे त्याने म्हटले आहे. आयपीएल स्पर्धेतील बायोबबलसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडणारा तो पहिला खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान ज्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली त्यात वृद्धिमान साहाचाही समावेश होता. एकपाठोपाठ एक अशा पद्धतीने खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयला 14 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच स्थगित करावी लागली होती.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये साहाने बायो-बबलच्या मुद्यावर स्पष्ट आणि मोकळेपणाने भाष्य केले. आयपीएल स्पर्धा मागील वर्षीप्रमाणे युएईत झाली असती तर बरे झाले असते, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. मागील वर्षी युएईतील स्पर्धेत सरावावेळी खेळाडूंशिवाय कोणीही मैदानात नसायचे. ग्राउंड्समनलाही एन्ट्री नसायची. भारतातील आयपीएलमध्ये तो प्रकार दिसला नाही. याठिकाणी बघ्यांची कमी नव्हती, असे सांगत यावर अधिक बोलणार नाही, असे तो म्हणाला. दोन्ही स्पर्धेदरम्या कुठे कमी पडलो याचा विचार आयोजकांनी करायला हवा, असेही तो म्हणाला आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान 4 मे रोजी साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याचा रिपोर्ट समोर आल्यानंतरच बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनातून तो सावरला असून इंग्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघासोबत असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. यापाठोपाठ चेन्नईच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या वृद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. बायोबबलचा फुगा फुटला कसा? असा प्रश्न स्पर्धा स्थगित झाल्यानंतर निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT