IPL 2022 Sakal
क्रीडा

IPL 2022: कोरोनाची अशीही भीती; ड्रेसिंग रुममध्ये मास्कचं पुनरागमन

आयपीएलच्या १५ व्या हंगामाला कोरोनाचं गालबोट लागलं असून दिल्लीच्या ताफ्यातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022: आयपीएलच्या १५ व्या हंगामाला कोरोनाचं गालबोट लागलं असून दिल्लीच्या ताफ्यातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतरही दिल्ली आणि पंजाबच्या दरम्यान सामना खेळवला गेला होता आणि त्या सामन्यात दिल्लीचा मोठा विजय झाला आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंवर आणि संघाच्या गोटात कोरोनाची भीती स्पष्ट दिसत होती.

काल (ता.२०) दिल्ली आणि पंजाबमध्ये सामना खेळला गेला. सामन्यात दिल्लीचा ९ गडी राखून मोठा विजय झाला असून सामना सुरु व्हायच्या आधी हा सामना होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. कारण सकाळी दिल्लीच्या ताफ्यातील सहा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते त्यामध्ये २ खेळाडू आणि ४ इतर सहकारी होते. त्यामुळे सकाळपासून हा सामना खेळला जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण अखेर सामना खेळवण्यास मंजूरी दिली गेली होती.

सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग, प्रविण आमरे, शेन वॉटसन आणि अजित आगरकर यांच्यासोबत संघातले सर्व खेळाडू तोंडाला मास्क लावून बसले होते. त्यांच्या गोटात कोरोनाची भीती स्पष्ट दिसत होती परंतु या सामन्यात दिल्लीने चांगली कामगिरी करत विजय मिळवला आहे.

प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने पंजाबला ११५ धावांवर रोखले होते. नंतर या धावांचा पाठलाग करताना ११ व्या षटकात त्यांनी विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT