Gautam Gambhir Sakal
क्रीडा

Lucknow Franchise चा मोठा डाव; Gautam Gambhir शी झाले कनेक्ट

सुशांत जाधव

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 15 व्या हंगामासाठी फ्रेंचायझी संघांनी संघ बांधणीला सुरुवात केलीये. आगामी हंगामात नव्याने मैदानात उतरणाऱ्या लखनऊ फ्रेंचायझीनं स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आणखी एक मोठा डाव खेळला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामासाठी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केल्यानंतर आता लखनऊने (Lucknow Franchise) गौतम गंभीरलाही आपल्यासोबत कनेक्ट केलं आहे. गौतम गंभीर आगामी काळात लखनऊच्या संघाचा मेंटोर असणार आहे.

यापूर्वी पंजाब किंग्ज संघाचे (Punjab Kings) माजी सहाय्यक प्रशिक्षक अँडी फ्लावर (Andy Flower) यांची लखनऊ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता लखनऊने भारताचा माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याऱ्या गौतम गंभीरला (Gautam Gambhir) संघाच्या मेंटोर पदी नियुक्त केले आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट राइडर्सने (Kolkata Knight Riders) दोन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे. गंभीरचे हेच यश पाहून नव्या फ्रेंचायझीने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. गंभीर मागील काही काळापासून स्टूडिओ आणि राजकारणाच्या मैदानात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ संघाने सर्वात आधी कोचिंगसाठी गौतम गंभीरशी संपर्क साधला होता. पण मैदानाबाहेर अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असल्यामुळे त्याने कोचिंगसाठी नकार दिला. पण यावर तोडगा काढत लखनऊ फ्रेंचायझीनं मेंटोर म्हणून त्याला आपल्या संघात आणले आहे.

गौतम गंभीरनं आयपीएलमध्ये 154 सामन्यातील 152 डावात 31.0 च्या सरासरीने 4217 धावा केल्या आहेत. गंभीरच्या खात्यात 36 अर्धशतकांची नोंद आहे. गंभीरने 2008 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) कडून आपला पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्याने दिल्लीकडून अखेरचा आयपीएल सामना खेळला.

संजीव गोयंका यांच्या मालकी हक्काच्या RPSG ग्रुपने लखनऊ संघासाठी 7 हजार 90 कोटी मोजले आहेत. संघ बांधणीसाठी मोठे निर्णय घेत संघ सुरुवातीपासूनच चर्चेत आले. पहिला हंगामासाठी मैदानात उतरण्यापूर्वी चांगल्या रणनितीतून उत्तम संघ निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. संघाचे नाव नेमक काय असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मुख्य कोच आणि मेंटोर ठरल्यानंतर संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश असणार याची उत्सुकता आता शिगेला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT