Punjab Kings Captain Sakal
क्रीडा

IPL 2022 : पंजाबचा 'सेनापती' ठरला; 12 कोटींच्या गड्यावरच 'प्रिती'

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार कोण? होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. लोकेश राहुलनं संघाची साथ सोडल्यानंतर त्याच्या जागेवर अनुभवी शिखर धवन दिसेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला. पण पंजाबने आयपीएल मेगा लिलावाआधी रिटेन केलेल्या मयांकला सेनापतीचा मुकूट दिला आहे. 12 कोटी मोजून पंजाब किंग्जने मयांकला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलमध्ये लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत त्याने याआधीही पंजाब किंग्जे नेतृत्व केले आहे. आता तो पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. (IPL 2022 Mayank Agarwal Named Punjab Kings Captai)

मयांक अग्रवालने केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाचे नेतृत्व केले होते. गेल्या दोन हंगामात अग्रवालने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 2011 ला आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने जवळपास 100 सामने खेळले आहेत. 31 वर्षाच्या या सलामीवीराने भारताकडून 19 कसोटी आणि 5 वनडे सामने देखील खेळले आहेत. पंजाबचा संघ आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 2014 मध्ये संघ फायनलपर्यंत पोहचला होता. यावेळी ते ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतील. मेगा लिलावामध्ये पंजाबने तगड्या खेळाडूंवर डाव लावत मजबूत संघ बांधणी केली आहे. मयांकच्या नेतृत्वाखाली संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT