MS Dhoni CSK Without Deepak Chahar  Sakal
क्रीडा

CSK ला मोठा धक्का; विक्रमी बोली लावली तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार

सुशांत जाधव

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात ज्या खेळाडूवर विक्रमी बोली लावली तो दीपक चाहर (Deepak Chahar) संपूर्ण हंगामाला मुकणार असल्याचे वृत्त आहे. आयपीएलच्या इतिहासात लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kkings) कधीच 10 कोटीपेक्षा अधिक रक्कम मोजली नव्हती. पण यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावात दीपक चाहरला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी त्यांनी 14 कोटी मोजले होते.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर दीपक चाहर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकला होता. आता तो आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही खेळू शकणार नसल्याचे वृत्त आहे. चेन्नई सुपर किंग्जने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी दीपक चहरला वेळ लागणार आहे. या दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामाला मुकू शकतो. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो संघाबाहेर पडला आहे.

दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकलेला दीपक चाहर बंगळुरुस्थित एनसीएमध्ये पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून आयपीएलच्या मैदानात उतरेल, असे बोलले जात होते. पण आता तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यताही धूसर झाली आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय गोलंदाजांना चांगलाच भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. यात दीपक चाहरच्या नावाचा समावेश होता. आयपीएलमध्ये चेन्नईसाठी तो याआधीही हुकमी एक्का ठरला आहे. त्यामुळे चेन्नईने त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दर्शवत त्याला संघात पुन्हा घेतले. पण आता चेन्नई सुपर किंग्जवर त्याच्याशिवाय खेळण्याची वेळ येण्याची भिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT