IPL 2022: लोकेश राहुलकडून नियमाचा भंग? sakal media
क्रीडा

IPL 2022: लोकेश राहुलकडून नियमाचा भंग?

पंजाबचे मालक वाडियांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आयपीएल फ्रँचायजी पंजाब किंग्जमध्ये गेल्या दोन हंगामांत कर्णधार म्हणून सर्व स्वातंत्र्य मिळूनही के. एल. राहुलने संघ सोडल्याबद्दल फ्रँचायजीचे सहमालक नेस वाडिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ‘राहुलने जर नवीन फ्रँचायजीशी आधीच संपर्क साधला असेल तर ते अनैतिक व बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमांच्या विरोधात आहे,’ असे वाडिया यांनी म्हटले आहे. २०२० च्या हंगामापूर्वी राहुलने आर. अश्विनकडून संघाच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारली होती. त्याने गेल्या हंगामात फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली असली, तरी तो पंजाबलाला प्ले-ऑफमध्ये नेण्यात अपयशी ठरला. दरम्यान, राहुल आधीच आरपीएसजी ग्रुपची मालकी असणाऱ्या नवीन लखनौ फ्रँचायजीच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे वृत्त आहे.

२०१० मध्ये रवींद्र जडेजाने त्याचा तत्कालीन संघ राजस्थान रॉयल्सने त्याला सोडण्यापूर्वीच इतर संघांशी कराराच्या वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्याला एका वर्षाच्या निलंबनाचा सामना करावा लागला होता. लखनौ आणि अहमदाबाद या नवीन संघांच्या फ्रँचायजींकडे २५ डिसेंबरपर्यंत तीन उपलब्ध खेळाडूंची निवड करण्यासाठी वेळ आहे. आर. अश्विन, हार्दिक पंड्या, रशीद खान आणि युझवेंद्र चहल यांच्यासोबत मुक्त होणाऱ्या मोठ्या नावांमध्ये राहुलच्याही नावाचा समावेश आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी अश्विनला जर कुठल्या नवीन संघाने निवडले नाही, तर पंजाब त्याला परत आणण्यास उत्सुक असेल. पंजाबने लिलावासाठी फक्त मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांनाच कायम ठेवले असून ते आता मेगा लिलावासाठी सर्वाधिक ७२ कोटी रुपये खर्च करण्यास पात्र असतील.

"आम्हाला राहुलला कायम ठेवायचे होते, पण त्याने पुन्हा लिलावात जाण्याचा हट्ट धरला. जर त्याने आधीच दुसऱ्या फ्रँचायजीशी संपर्क साधला असेल तर ते बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमांना धरून नाही."

- नेस वाडिया, सहमालक, पंजाब किंग्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT