IPL 2022 Will Delhi Capitals make history under Pant leadership  sakal
क्रीडा

IPL 2022 Delhi Capitals : पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स इतिहास रचणार?

गंभीर, सेहवाग, अय्यरला जमलं नाही ते पंत करून दाखवणार का?

Kiran Mahanavar

Delhi Capitals : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 साठी सर्व संघ सज्ज आहेत. यावेळी अनेक संघ आहेत जे त्यांचे पहिले विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करतील. दिल्ली कॅपिटल्स देखील या संघांपैकी एक आहे. दिल्ली कॅपिटल्सने अद्याप एकही आयपीएल विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे ऋषभ पंत आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील इतिहास रचण्याकडे संघाची नजर असेल.

2008 पासून आयपीएलचा भाग असलेल्या दिल्लीने आतापर्यंत फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली आहे. याआधी संघाची कमान गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, श्रेयस अय्यर या दिग्गज खेळाडूंच्या हातात आहे. पण जेव्हापासून ऋषभ पंतने जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून संघाची कामगिरी चांगली होत आहे.

मेगा लिलावात यावेळी संघाने संपूर्ण चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने यावेळी ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिक नोर्किया (6.5 कोटी) यांना कायम ठेवले होते. एनरिक नोर्किया, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एन्गिडी, चेतन साकारिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी आणि कुलदीप यादव यांच्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची जबाबदारी असेल. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजी सांभाळतील.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स

•   2008- चौथे स्थान

•   2009- तिसरे स्थान

•   2010- 5वे स्थान

•   2011- 10वे स्थान

•   2012- 3रे स्थान

•   2013- 9वे स्थान

•   2014- 8 वे स्थान

•   2015- 7वे स्थान

•   2016 - सहाव्या स्थानावर

•   2017- 6 वे स्थान

•   2018- 8 वे स्थान

•   2019- 3रे स्थान

•   2020- उपविजेता

•   2021- तिसरे स्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT