IPL 2023 Auction Sam Curran Ben Stokes esakal
क्रीडा

IPL 2023 Auction : कोण मोडू शकतो ख्रिस मॉरिसचे रेकॉर्ड, स्टोक्स की सॅम?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Auction : शुक्रवारी दि. 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठी छोटा लिलाव होणार आहे. यासाठी 405 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणता संघ कोणत्या खेळाडूसाठी आपला खिसा रिकामा करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपची देखील छाप पहायला मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अशा कोणत्या पाच खेळाडूंवर या लिलावात छप्पर फाड के बोली लागू शकते हे पाहुयात.

1 बेन स्टोक्स

बेन स्टोक्सने गेल्या आयपीएल हंगामातून माघार घेतली होती. मात्र आता आगामी वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे त्यामुळे सर्वच विदेशी खेळाडू भारतात खेळण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठी आयपीएलासारखा दुसरा चांगला पर्याय नाही.

बेन स्टोक्स हा अष्टपैलू खेळाडू असल्याने प्रत्येक फ्रेंचायजी त्याच्या मागे हात धुवून मागे लागेल. यापूर्वीही स्टोक्सवर हंगामातील सर्वाधिक बोली लागली होती. यंदाच्या लिलावात तो ख्रिस मॉरिसचे 16.25 कोटी रूपयांची सर्वाधिक बोली लागण्याचा विक्रम मोडतो का हे पहावे लागले.

2 कॅमेरून ग्रीन

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने देखील भारताविरूद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्य्मुळे त्याच्यावर देखील यंदा फ्रेंचायजींची नजर असेल. त्याची स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजी पाहता त्याला चांगली बोली लागू शकते. त्याने आपली बेस प्राईस 2 कोटी रूपये ठेवली आहे.

3 सॅम करन

चेन्नई सुपर किंग्जकडून गेले हंगामा गाजवणारा सॅम करन देखील यंदाच्या लिलावातील एक लक्षवेधी खेळाडू ठरू शकतो. करनसाठी त्याची जुनी फ्रेंचायजी चेन्नई सुपर किंग्ज चांगलाच जोर लावू शकते. त्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील चांगली कामगिरी केली असून त्याच्यासाठी अनके फ्रेंचायजी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याच्या तयारीत नक्कीच असतील.

4 सिकंदर रझा

झिम्बाब्वेचा हा फिरकी अष्टपैलू खेळाडू टी 20 वर्ल्डकपमध्ये धमाल करून गेला. त्यामुळे त्याच्यावर देखील यंदाच्या लिलावात पैशांचा पाऊस पडू शकतो.

5 नारायण जगदीशन

नारायण जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीत 830 धावा केल्या असून त्याने सलग 5 शतके ठोकण्याचा कारनामा देखील केला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात त्याच्यावरही लक्ष्मीची कृपा होऊ शकते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT