Ravindra Jadeja  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja बाहेर पडणार? CSK च्या सीईओने केला खुलासा

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट जगतात सध्या टी २० विश्वचषकाचा फिव्हर पाहायला मिळत आहेत. यानंतर आयपीएलचा थरार रंगणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या विश्वातून महत्त्वाच्या अपडेट्स समोर आहेत. १० फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाला त्यांचे काही खेळाडू करारमुक्त करायचे असतील, तर त्यांची यादी सादर करण्यासाठी केवळा १५ दिवस उरले आहेत. अशातच सीएसकेला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. (IPL 2023 IS Ravindra Jadeja Will Not Play For Chennai Super Kings Next Year Kasi Viswanathan)

जडेजाला करारमुक्त करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. जडेजा पुढील हंगामात चेन्नईकडून खेळणार नसल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. त्याचबरोबर तो संघासोबतच राहणार असल्याचेही काही जण सांगत आहेत. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी जडेजाला करारमुक्त करण्याचे वृत्त फेटाळून लावले.

काशी विश्वनाथन काय म्हणाले?

जडेजा हा संघातील महत्त्वाचा सदस्य असून तो फ्रँचायझीसोबत असेल. रवींद्र जडेजाबाबत मीडियामध्ये येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत.’ गेल्या सीझनमध्ये जडेजाला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. आठ सामन्यांमध्ये संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा संघाची कमान सोपवण्यात आली. तो या सीझनमध्येही कर्णधार असेल. अशी माहिती विश्वनाथन यांनी दिली.

तसेच, जडेजा चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचा महत्त्वाचा सदस्य आहे. फ्रँचायझी जाडेजाची हकालपट्टी करण्याचा विचारही करू शकत नाही. तो ट्रेंडिग आहे. जडेजाला आम्ही संघात ठेवू. अशा ठाम शब्दात विश्वनाथन यांनी जडेजा संघातून बाहेर पडण्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला.

आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. याआधी, १० फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाला त्यांचे काही खेळाडू करारमुक्त करायचे असतील, तर त्यांची यादी सादर करावी लागणार आहे. ही यादी सादर करण्याच्या अंतिम तारखेला सुमारे १५ दिवस उरले आहेत. या आधीही अनेक संघ आपल्या काही बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT