IPL 2023 MS Dhoni Retirement esakal
क्रीडा

IPL 2023 MS Dhoni Retirement : धोनीची IPL कारकीर्द संपणार! CSK च्या अधिकाऱ्याने दिली मोठी अपडेट

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 MS Dhoni Retirement : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी बाबत एक मोठी अपडेट आली आहे. आयपीएल 2023 चा हंगाम हा महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा हंगाम असणार आहे. महेंद्रसिंह धोनीने याबाबत चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या काही सांगितलेले नाही.

मात्र CSK संघ व्यवस्थापनाला याची कल्पना आहे की धोनी आयपीएलची आपली शेवटची मॅच ही चेपॉकच्या प्रेक्षकांसमोर खेळेल. संघ व्यवस्थापनाला धोनी आयपीएलचा हंगाम सुरू होण्यापूर्वी अधिकृतरित्या याबाबत माहिती देईल अशी आशा आहे.

याबाबत बोलताना चेन्नई सुपर किंग्जचे अधिकारी म्हणाले की, 'आम्हाला वाटतंय की धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. धोनी आपली आयपीएल कारकीर्द ही आपल्या फेव्हरेट स्टेडियमवर संपवण्याची शक्यता आहे. याबाबत आपल्याला आयपीएल हंगाम सुरू झाल्यावर कल्पना येईल.'

धोनीने आयपीएल 2022 च्या हंगामात रविंद्र जडेजाकडे चेन्नईचे कर्णधापद सोपवून एकप्रकारे संकेत दिलेच होते. मात्र जडेजाच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खालावली त्यामुळे अर्ध्यातून धोनीने पुन्हा संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती.

मात्र यंदाच्या हंगामात धोनीचे उत्तराधिकारी होण्याची क्षमता असलेले दोन खेळाडू संघात आले आहेत. बेन स्टोक्स आणि अजिंक्य रहाणे दोघेही सीएसकेचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळे धोनी त्याची कारकिर्द बिंधास्तपणे संपवू शकतो.

याबाबत सीएसकेचा अधिकारी म्हणतो की, 'महेंद्रसिंह धोनीने त्याच्या निर्णयाबाबत अजून आम्हाला काही कळवलेले नाही. तसेही त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी कोणताही दबाव नाही. तो आमचा लिडर आहे त्यामुळे तो संघासाठी काय योग्य आहे हे पाहूनच निर्णय घेईल. संघ व्यवस्थापनाविषयी बोलायचं झालं तर या हंगामानंतरही तो खेळू इच्छित असेल तर आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT