IPL 2023 ms dhoni sixes CSK nets sessions video goes viral 
क्रीडा

IPL 2023: माही मार रहा है! IPLपूर्वी धोनीने नेटमध्ये घातला धुमाकुळ, व्हिडिओ व्हायरल

आयपीएलमध्ये धोनीची जादू आजही कायम

सकाळ डिजिटल टीम

महेंद्र सिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण आयपीएलमध्ये त्याची जादू आजही कायम आहे. फक्त धोनीचा खेळ पाहण्यासाठी सीएसकेच नाही, तर जगभरातील कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमी आतुर असतात. दरम्यान धोनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो फटकेबाजी करताना दिसत आहे. (IPL 2023 ms dhoni sixes CSK nets sessions video goes viral)

आयपीएलचा 16वा सीझन सुरु होणार आहे. ज्यामध्ये पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने आगामी हंगामासाठी तयारी सुरू केली असून चेन्नईमध्ये सुरू असलेल्या सराव शिबिरात संघातील खेळाडू कंबर कसताना दिसत आहेत.

या खेळाडूंमध्ये धोनी सर्वांचे विशेष लक्ष वेधले आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्टेडियममध्ये सराव करत दिसली. आक्रमक फटक्यांचा सराव करताना धोनीने काही चेंडू स्टेडियमबाहेर मारले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो

महेंद्र सिंह धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. त्याचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. चेन्नईच्या चाहत्यांसमोर त्याला आयपीएलमधील शेवटचा सामना खेळायला आवडेल, असे धोनीने आपल्या आधीच्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

अशा स्थितीत तो या सीझननंतर अलविदा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र धोनीकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT