MS Dhoni And Rohit Sharma
MS Dhoni And Rohit Sharma Sakal
क्रीडा

IPL 2023 : धोनी आयपीएलमधून रिटायर होणार तरी कधी? प्रश्नावर 'हिटमॅन'चा सिक्सर, म्हणाला…

सकाळ डिजिटल टीम

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आगामी हंगामानंतर निवृत्ती घेतली आहे. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा ४१ वर्षीय धोनी चेन्नईमध्ये शेवटचा सामना खेळणार असल्याचे आधीच सांगितले आहे.

तसेच या वर्षानंतर तो या स्पर्धेत खेळणार नसल्याचे अनेक तज्ज्ञांनी आधीच सांगितले आहे. नुकतेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला याबाबत विचारले असता त्याने मजेशीर उत्तर दिले.

मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांना एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हटले जाते. मुंबईने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. तर चेन्नईला चार वेळा यश मिळाले आहे. जेव्हा रोहितला चेन्नईच्या कर्णधारपदाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, धोनी आयपीएलच्या पुढील दोन-तीन हंगामात खेळण्यासाठी योग्य आहे.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर १६व्या हंगामातील पहिला सामना ३१ मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. चेन्नईला चार वेळा यश मिळाले आहे. जेव्हा रोहितला चेन्नईच्या कर्णधारपदाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, धोनी आयपीएलच्या पुढील दोन-तीन हंगामात खेळण्यासाठी फीट असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर १६व्या हंगामातील पहिला सामना ३१ मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

काय म्हणाला रोहित शर्मा?

मुंबई इंडियन्सच्या प्री-सीझनच्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला,मी गेल्या दोन-तीन सीझनपासून ऐकत आलो आहे की महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सीझन असेल. मला असे वाटते की तो येणाऱ्या अनेक सीझनसाठी तंदुरुस्त दिसत आहे. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचे नेतृत्व धोनीच्या हाती होते तेव्हाच त्याची कारकीर्द बहरली. त्याला भारताचा माजी कर्णधार धोनीनेने सलामीवीर बनवले आणि त्यानंतर रोहितने भारतासाठी अनेक विक्रम केले.

रियान परगनेही केलं धोनीचं कौतुक

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने देकील धोनीचे कौतुक केले होते. त्याने सांगितले की धोनीने फिनिशरची भूमिका पार पाडली आहे आणि या प्रकरणात त्याच्या जवळचे कोणीही नाही. गुवाहाटी येथील रियान पराग (२१) हा पाचवे आयपीएल खेळणार आहे. तो म्हणाला की फिनिशरची भूमिका बजावण्यात मला आनंद वाटतो आणि जर संधी मिळाली तर त्याला स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायलाही आवडेल.

रियान पराग म्हणाला की ,मी गेल्या तीन वर्षांपासून फिनिशरची भूमिका निभावत आहे. जेव्हा मी फिनिशरचा विचार करतो तेव्हा माझ्या मनात एकच नाव येतं - एमएस धोनी. मला वाटत नाही की या कलेत त्याच्याइतका कोणी पारंगत असेल. तो खेळ कसा संपवतो किंवा तो खेळ कसा शेवटापर्यंत नेतो हे मी पाहत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT