IPL 2023 Opening Ceremony  esakal
क्रीडा

IPL 2023 Opening Ceremony : अरिजीतचा स्वर तर रश्मिकाच्या अदांनी आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा फुटला नारळ

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Opening Ceremony : इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम दणक्यात सुरू करण्यासाठी बीसीसीआयने कोणतीही कसर ठेवलेली नाही. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच कोणतेही निर्बंध न लावता आयपीएल पूर्वीच्या रूपात चाहत्यांसमोर येत आहे. आता आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ असतील आणि हे दहा संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या संघाला होम ग्राऊंडवरून चिअर करण्याची संधी मिळणार आहे.

यंदाच्या हंगामाची दमदार सुरूवात करण्यासाठी उद्घाटन सोहळ्याला भारतातील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग, नॅशनल क्रश रश्मिका मानधना आणि तमन्ना भाटिया यांची उपस्थिती होती. या सर्व स्टार्सनी आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी आपली कला सादर करत चाहत्यांचे मनोरंजन केले. या उद्घाटन सोहळ्याच्या सर्व अपडेट एका क्लिकवर

रश्मिका मंधानाने लावले चार चांद

आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया यांनी ओपनिंग सेरेमनीला आपल्या नृत्याविष्काराने चार चांद लावले.

अरिजीत सिंगच्या गायकीने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने ए वतन वतन, झुमे जो पठाण, ओम नम: शिवाय अशा प्रसिद्ध गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

मंदिरा बेदीने केली उद्घाटन सोहळ्याची सुरूवात

महिला प्रीमियर लीग प्रमाणे आयपीएल 2023 च्या उद्घाटन सोहळ्याची सुरूवात देखील प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटर मंदिरा बेदीने आपल्या ओपनिंग रिमार्कने केली.

काहीच वेळात सुरू होणार रंगारंग कार्यक्रम

आयपीएल 2023 ची सुरूवात उद्घाटन सोहळ्याने सुरूवात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bhima Inquiry : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात नवे वळण; ठाकरे यांचे आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर!

"आमच्यात भांडण.." रितेशबरोबरच्या वादांच्या चर्चांवर रवी जाधव व्यक्त ; राजा शिवाजी सिनेमाबद्दल म्हणाले..

German Silver : चांदीला स्वस्त पर्याय म्हणून जर्मन कारागिरांनी तयार केला सेम टू सेम धातू, पण तुम्ही फसू नका; फरक कसा ओळखाल? जाणून घ्या

Ambegaon News : कपिल काळेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

White vs Brown vs Multigrain Bread: व्हाइट, ब्राउन की मल्टीग्रेन ब्रेड? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT