ipl 2023-rcb-batsman-will-jacks 
क्रीडा

IPL 2023 : विराट कोहलीच्या RCB ला मोठा धक्का! IPL मधून 3.20 कोटींचा फलंदाज बाहेर

Kiran Mahanavar

फाफ डुप्लेसीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि विराट कोहलीची उपस्थिती IPL 2023 सुरू होण्यापूर्वी वाईट बातमी आली आहे. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज विल जॅक्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या जॅकला आरसीबीने लिलावात 3.20 कोटी खर्च करून संघात समाविष्ट केले.

बांगलादेश दौऱ्यावर विल जॅकला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला आयपीएलमधून आपले नाव मागे घ्यावे लागले. आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलचे कव्हर म्हणून विल जॅकचा संघात समावेश केला होता. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जॅकला स्नायूंना दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आयपीएस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

विल जॅकची गणना टी-20 मधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत 109 सामन्यांमध्ये 2802 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. जॅकच्या नावावर टी-20 मध्ये 140 षटकार आहेत आणि तो गोलंदाजीही करतो. विल जॅकने अलीकडेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले आहे.

विल जॅकच्या अनुपस्थितीत आरसीबीला बदलीची आवश्यकता असणार आहे. ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, यासाठी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलशी चर्चा सुरू आहे. ब्रेसवेलने आयपीएल लिलावात भाग घेतला होता आणि त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. मात्र त्यानंतर त्याला खरेदीदार सापडला नाही.

मायकेल ब्रेसवेलने गेल्या जानेवारीत भारताविरुद्ध शतक झळकावले. RCB 2 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर IPL 2023 मध्ये त्यांचा पहिला सामना खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT