Punjab Kings Mistakenly buy Shashank Singh IPL 2024 auction News marathi sakal
क्रीडा

PBKS News : IPL लिलावात मोठा गोंधळ! एका नावामुळे फसली प्रिती झिंटा अन् लाखोंचा लागला चुना

Kiran Mahanavar

Punjab Kings Mistakenly buy Shashank Singh IPL 2024 auction News : आयपीएल 2024 चा लिलाव संपला आहे. मंगळवार 19 डिसेंबरला झालेल्या या लिलावानंतर सर्व 10 संघांनी आपल्या ताफ्यात 25-25 खेळाडू घेतले आहेत. पण लिलावामध्ये काल एक मनोरंजन गोष्ट पाहिला मिळाली. पंजाबची मालकीन प्रिती झिंटा एका नावामुळे फसली. आणि या लिलावात चुकीच्या खेळाडूला विकत घेतले.

खरं तर झालं असं की, पंजाब किंग्जच्या टीमला शशांक सिंग नावाच्या 19 वर्षीय क्रिकेटरला आपल्या टीममध्ये घ्यायचं होतं. पण चुकून त्यांनी 32 वर्षीय छत्तीसगडचा क्रिकेटर शशांक सिंगला विकत घेतलं. या चुकीनंतर पंजाबने ही बोली मागे घेण्याची चर्चा केली. पण तसे होऊ शकले नाही आणि छत्तीसगडचा शशांक 20 लाख रुपयांना पंजाबमध्ये सामील झाला.

विशेष म्हणजे 32 वर्षीय शशांक (अनकॅप्ड खेळाडू) जो मूळचा छत्तीसगडचा आहे. आणि यापूर्वी सनरायझर्स हैदराबादमध्ये होता, तो गेल्या लिलावात विकला गेला नाही. पंजाब किंग्जचे मालक वाडिया आणि झिंटा यांनी शशांकची बोली मागे घेणाचा प्रयत्न केला, परंतु लिलावाचे नियमामुळे असे झाले नाही.

शशांकच्या टी-20 रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 55 टी-20 सामन्यांमध्ये 135.83 च्या स्ट्राइक रेटने 724 धावा केल्या आहेत. आणि 15 विकेट्सही घेतल्या आहेत. मात्र, शशांकला पंजाब किंग्जसाठी संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, पण काहीही झाले तरी चाहते सोशल मीडियावर प्रीती झिंटा आणि पंजाब किंग्जचा आनंद घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT