Gautam Gambhir  esakal
क्रीडा

IPL 2024 : गौतम गंभीरने लखनऊ संघाची सोडली साथ! नव्या सीझनमध्ये 'या' संघाचा धरला हात

Kiran Mahanavar

Gautam Gambhir appointed as mentor of KKR : आयपीएलच्या मागील दोन हंगामामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएल 2024 पूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आधीच संघ सोडला होता. आता मार्गदर्शक गौतम गंभीरनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

स्वतः गंभीरने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. आता तो कोलकाता नाईट रायडर्सचा नवा मार्गदर्शक बनला आहे. केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत, तर कर्णधार श्रेयस अय्यर आहे.

आयपीएल 2023 चा हंगाम संपल्यानंतर गौतम गंभीरने शाहरुख खानची भेट घेतली होती, ज्यानंतर तो आयपीएल संघात सामील होऊ शकतो अशी अटकळ सुरू झाली. केकेआर CEO वेंकी म्हैसूर यांनी आज (बुधवार, 22 नोव्हेंबर) घोषणा केले की, माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर केकेआरमध्ये "मार्गदर्शक" म्हणून काम करणार आहे. आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशी जवळून काम करेल.

लखनऊ सुपर जायंट्सचे मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरनेही एक भावनिक संदेश शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हे पद सोडताना खूप भावूक दिसत होता.

गौतम गंभीरने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट लिहिली की, डॉ. गोएंका यांचे नेतृत्व उत्कृष्ट होते, मला आशा आहे की लखनऊ संघ भविष्यातही चांगली कामगिरी करेल, यामुळे एलएसजीच्या चाहत्यांना अभिमान वाटेल. संघाला शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT