KKR Shreyas Iyer  sakal
क्रीडा

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सची मोठी घोषणा! 'या' खेळाडूच्या हातात दिली संघाची धूरा

Kiran Mahanavar

IPL 2024 KKR confirms Shreyas Iyer as captain : इंडियन प्रीमियर लीग 2024 ची सर्व संघानी तयारी सुरू केली आहे. या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबरला दुबई येथे होणार आहे. आयपीएल 2024 च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सने एक मोठी घोषणा केली आहे.

केकेआरने मागील हंगामात दुखापतीमुळे न खेळलेल्या श्रेयस अय्यर आता आगामी हंगामात कर्णधार बनवले आहे. केकेआरने गुरुवारी (१४ डिसेंबर) ही अधिकृत घोषणा केली.

केकेआरने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी माहिती शेअर केली आहे. नितीश राणाच्या जागी संघाने अय्यरला पुन्हा कर्णधार बनवले आहे. दुखापतीमुळे अय्यर गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. यामुळे नितीशने संपूर्ण हंगामात कर्णधारपद भूषवले. आता अय्यरच्या पुनरागमनाने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. नितीशला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

आयपीएल 2022 मध्ये त्याने केकेआरसाठी 14 सामन्यांमध्ये 30.85 च्या सरासरीने आणि 134.56 च्या स्ट्राइक रेटने 401 धावा केल्या होत्या. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 101 सामन्यांमध्ये 31.55 च्या सरासरीने 2,776 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 धावांची आहे. अय्यरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकही शतक झळकावलेले नाही. मात्र, त्याने 19 अर्धशतके झळकावली आहेत.

केकेआरने कायम ठेवलेला संपूर्ण संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, वैभव अरोरा आणि सुयश शर्मा.

गौतम गंभीरच्या रूपाने संघात नवा मार्गदर्शक आला आहे. अशा स्थितीत त्याला लिलावात नवीन संघ तयार करायचा आहे. संघाच्या पर्समध्ये 32.7 कोटी रुपये शिल्लक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT