IPL 2024 Mumbai Indians Squad sakal
क्रीडा

IPL 2024 Mumbai Indians Squad : अंबानींनी लिलावात घेतले 8 खेळाडू! कर्णधार हार्दिक पांड्याला मिळाला 'हा' संघ, संपूर्ण लिस्ट

Kiran Mahanavar

IPL 2024 Mumbai Indians Full Squad : इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील वर्षीच्या हंगामाचा लिलाव मंगळवार 19 डिसेंबरला दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मुंबई इंडियन्स संघ नव्या कर्णधारासह नव्या हंगामात खेळणार आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. लिलावात या संघाने 8 खेळाडूंवर पैसे गुंतवले आणि त्यांना आपल्या ताफ्यात घेतले आहे.

आयपीएल 2024 च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 8 खेळाडूंवर पैसे खर्च केले. आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान आपल्या दमदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या जेराल्ड कोएत्झीवर संघाने सर्वाधिक 5 कोटी रुपये खर्च केले.

मुंबई इंडियन्स संघाने नवीन हंगामात कर्णधार बनलेल्या हार्दिक पांड्याला व्यापारातून विकत घेतले. गुजरात टायटन्ससाठी मागील दोन हंगाम खेळलेल्या या अष्टपैलू खेळाडूला 15 कोटी रुपये देऊन संघात घेतले.

2024 च्या लिलावात मुंबईने विकत घेतले :

जेराल्ड कोएत्झी (5 कोटी), दिलशान मदुशंका (4.6 कोटी), नुवान तुषारा (4.80 कोटी), मोहम्मद नबी (1.50 कोटी), श्रेयस गोपाल (20 लाख), शिवालिक शर्मा (20 लाख), अंशुल कंबोज (20 लाख रुपये), नमन धीर (20 लाख रुपये).

मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, डेव्हिस ब्रेविस, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, रोमारिओ शेफर्ड, शम्स मुलानी, नेहल वधेरा, गेलार्ड कोएत्झी, जसप्रीत बुमरा, कुमार कार्तिकेय, पियूष चावला, आकाश मधवाल जेसन बेहेरन्डॉफ, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अनशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

Kelva Beach: वीकेंडला निसर्गाचा आनंद घ्यायचा? मग डहाणू ट्रेनने निघा आणि थेट ‘केळवा बीच’वर पोहोचा

Maharashtra Politics:'सुशीलकुमार शिंदेंच्या गुगलींवर शरद पवारांचा गुड लेफ्ट'; बॅटिंग टाळली, जुन्या आठवणींना उजाळा..

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

SCROLL FOR NEXT