IPL 2022 Delhi Capitals sakal
क्रीडा

IPL 2022 : दिल्लीची नवी जर्सी; पंतनं शेअर केला खास फोटो

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही नव्या मोसमासाठी सज्ज

Kiran Mahanavar

IPL 2022 Delhi Capitals : इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी आता सर्व संघ सज्ज झाले आहेत. अवघ्या 5 दिवसांनी सर्वात मोठा कारवा सुरू होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही नव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत धमाल करणाऱ्या पंतवर आता आपल्या संघासाठी पहिली आयपीएल किताब जिंकण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिल्ली कॅपिटल्सच्या नवीन जर्सीमधील 'गुड मॉर्निंग फ्रेंड्स' फोटो शेअर केला आहे.(IPL 2022 Delhi Capitals)

शार्दुल ठाकूरला खरेदी करण्यासाठी यावेळी दिल्ली कॅपिटल्सने खूप पैसा खर्च केला आहे. मेगा लिलावात शार्दुल ठाकूरला 10.75 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले असून, तो सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे कुलदीप यादवबद्दल बोलायचे झाले तर त्याला 2 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे.

ऋषभ पंत सध्याच्या आयपीएलमधील सर्वात तरुण कर्णधार आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर असताना दिल्ली कॅपिटल्सने त्याला कर्णधार बनवले होते. तेव्हापासून दिल्लीची कमान त्यांच्या हातात आहे. तर श्रेयस अय्यर आता कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 27 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. जो मुंबईतील सीसीआय स्टेडियमवर खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : टीएमसी कार्यालयात गोंधळ उडाला

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT