IPL2024 Esakal
क्रीडा

Virat Kohli: तोच विराट अन् तिचं बेन स्टोक्सची आठवण,नॉन स्ट्रायकर एंडवर विराटचा कारनामा; ऐकून मॅक्सवेलही खुदकन गालात हसला

विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांची जोडी खेळपट्टीवर खेळत असताना या असं काही घडल्याने ज्याने प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं.

Manoj Bhalerao

Virat Kohli Remarks on Harprit Brar: सालाबादप्रमाणे यंदाही आयपीएल स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होतय. अशातच सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये सामना खेळवला गेला. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांची जोडी खेळपट्टीवर खेळत असताना या असं काही घडल्याने ज्याने प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं.

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान पीबीकेएसचा फिरकीपटू हरप्रीत ब्रारने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले. हरप्रीतने चार षटकांत केवळ १३ धावा दिल्या आणि दोन बळीही घेतले. हरप्रीतने रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हरप्रीत आरसीबीच्या डावातील 13 वे षटक टाकण्यासाठी आला, त्यावेळी ग्लेन मॅक्सवेल स्ट्राइकवर होता आणि विराट कोहली नॉन-स्ट्रायकर एंडवर होता.

षटकांमधील ब्रेकमुळे विराट कोहली खूश दिसत नव्हता. ब्रार गोलंदाजी करायला तयार असताना नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला विराट कोहली म्हणाला, ' ***** श्वास तर घेऊ दे.' विराटने पंजाबी भाषेत अपशब्द वापरले. (Latest marathi news)

हे ऐकून ग्लेन मॅक्सवेल हसायला लागला. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पंजाब किंग्जने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या, प्रत्युत्तरात आरसीबीने 19.2 षटकांत सहा गडी गमावून 178 धावा केल्या आणि सामना चार विकेट राखून जिंकला.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 च्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीची बॅट ज्या पद्धतीने खेळली आहे, त्याने दाखवून दिले आहे की, क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये त्याला पूर्ण समजणे ही कोणाचीही सर्वात मोठी चूक असेल. आयपीएल सुरू होण्याच्या काही दिवस आधी, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की विराट कोहलीला आयसीसी टी -20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघात स्थान मिळत नाही. (Latest marathi news)

बरं, नंतर ही बातमी पूर्णपणे चुकीची घोषित करण्यात आली आणि असे सांगण्यात आले की विराट कोहलीचे आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळणे जवळपास निश्चित आहे. 25 मे रोजी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध 77 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळल्यानंतर विराट कोहलीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी विराटने हर्षा भोगलेच्या प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे दिली, त्यावरून त्याचा आत्मविश्वास नेहमीप्रमाणेच उंचावल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

SCROLL FOR NEXT