IPL 2022 Retention  Sakal
क्रीडा

IPL 2022 Retention : जाणून घ्या संपूर्ण खेळाडूंची यादी

सुशांत जाधव

IPL 2022 Retention DEADLINE Day : आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या हंगामापूर्वी आठ फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने आणि त्यांच्या पाठोपाठ चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी 4-4 खेळाडूंसाठी 42 कोटी खर्च केले. कोणता संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार याची उत्सुकता सर्व क्रिकेट प्रेमींना होती. ही नावे आता स्पष्ट झाली आहेत. जाणून घेऊयात कोणत्या संघाने कोणाला रिटेन केले.....

आठ फ्रेंचायझींनी या खेळाडूंना केले रिटेन

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) : रविंद्र जाडेजा, महेंद्रसिंह धोनी, ऋतूराज गायकवाड, मोईन अली.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR): सुनील नारायण, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

सनरायझर्स हैदराबाद (SRH): केन विल्यमसनस अब्दुल समदस उमरान मलिक

मुंबई इंडियन्स (MI) : रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, केरॉन पोलार्ड, सुर्यकुमार यादव.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज

दिल्ली कॅपिटल्स (DC) : रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, नोर्तजे.

राजस्थान रॉयल्स (RR) : संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल

पंजाब किंग्ज (PBKS) : मयांक अग्रवाल, अर्शदीप सिंग.

नव्या फ्रेंचायझींना केएल राहुल, राशिद खान आणि श्रेय्यस ठरु शकतील उत्तम पर्याय

पंजाबने लोकेश राहुलला आणि सनरायझर्सने राशिद खानला रिलीज केल्यानंतर नव्या फ्रेंचायझींना हे दोन उत्तम पर्याय असतील. या दोघांशिवाय श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून नव्या संघात दिसू शकतो.

हैदराबादने राशिद खानलाही दाखवला बाहरेचा रस्ता

सनरायझर्स हैदराबादचा संघ राशिद खानसाठी 12 कोटी मोजून रिटेन करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर येत होते. मात्र हैदराबाद त्याला रिलीज करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रसारमाध्यमात रंगलेल्या चर्चेनुसार तो लखनऊमध्ये खेळणार की नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तो स्पर्धेला मुकणार हे येणारा काळच ठरवेल.

राजस्थान रॉयल्स युवा यशस्वीला पुन्हा संधी देणार?

राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला 14 कोटी मोजून रिटेन केलं आहे. आयपीएलमध्ये रिटेन होणारा तो पहिला खेळाडू ठरलाय. त्याच्यासोबत राजस्थान युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला संघात स्थान देईल, अशी चर्चा सुरु आहे. जयस्वालसह बटलरलाही रिटेन केल्याचे बोलले जात आहे. लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.

गंभीरने इशांन ऐवजी दिली सुर्यकुमारला पसंती

मुंबई इंडियन्सच्या संघासमोर नेमकं कोणाला रिटन करावं? याचा मोठा पेच असेल. रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह रिटेन होणार हे फिक्स आहे. याशिवा पोलार्ड आणि इशान किशनच्या नावाची चर्चा आहे. मुंबई इंडियन्सने इशान ऐवजी सुर्यकुमार यादवला रिटेन करावं असे मत गंभीरने व्यक्त केले आहे.

वॉर्नर आउट, हैदराबाद केन विल्यम्सनला एकट्याला रिटेन करणार?

सनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वॉर्नरला रिलीज करणार हे पक्के झाले आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा करत ऑस्ट्रेलियन संघाला वर्ल्ड विजेता बनवण्यात मोलाचा वाटा उचलला .त्याच्यासाठी मेगा लिलावात कोणता संघ बोली लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT