AB de Villiers | Scott Styris | IPL  Sakal
IPL

IPL 2024: 'आधी RCB चा शर्ट घालणं बंद कर…', एबी डिविलियर्स स्कॉट स्टायरिसला असं का म्हणाला?

AB de Villiers: एबी डिविलियर्सने चेन्नई सुपर किंग्सचा माजी क्रिकेटपटू स्टायरिसला आरसीबीचा शर्ट घालणं बंद करण्यासाठी सांगितलं आहे, यामागचं कारण जाणून घ्या.

Pranali Kodre

IPL 2024, RCB News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता रोमांचक वळणावर आली आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील आता काहीच सामने बाकी आहेत. अशात माजी क्रिकेटपटूंमध्येही संघांच्या कामगिरीवरून मजामस्ती सुरू आहे.

अशीच एक घटना न्यूझीलंड आणि चेन्नई सुपर किंग्सचे माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिविलियर्स यांच्यात पाहायला मिळाली आहे.

यंदाच्या हंगामात बेंगळुरूची कामगिरी अत्यंत सुमार झाली आहे. त्यांना पहिल्या सात सामन्यांतील 6 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. दरम्यान, डिविलियर्स आणि बेंगळुरूच्या काही चाहत्यांनुसार स्टायरीस यांनी बेंगळुरूची जर्सी घालणे संघासाठी अशुभ ठरत आहे. त्यामुळे डिविलियर्सने स्टायरिस यांना ही जर्सी घालणे बंद करण्याबद्दलही चेतवले आहे.

खरंतर स्टायरिस यांना बेंगळुरूची जर्सी घालणे बंधनकारक एबी डिविलियर्सनेच केले होते, परंतु, आता त्यानेच त्यांना असं न करण्याबद्दल सांगितले. बेंगळुरूने यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात रोमांचक विजय मिळवला होता.

त्यावेळी जिओ सिनेमासाठी समालोचन करत असताना डिविलियर्स आणि स्टायरिस यांच्यात एक पैज लागली होती. डिविलियर्सने म्हटले होते की जर बेंगळुरूने पंजाबला हरवले, तर स्टायरिसने बेंगळुरूच्या प्रत्येक सामन्यावेळी त्यांची जर्सी घालायची. मात्र, पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पाचही सामन्यात बेंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला.

सोमवारी (१५ एप्रिल) बेंगळुरुने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सलग 5 वा सामना हरला. यानंतर लाईव्ह शोमध्ये स्टायरिस यांनी म्हटले की बेंगळुरुसाठी ते अशुभ ठरत आहेत. यावर डिविलियर्सने लगेचच कमेंटही केली होती की 'कृपया तो शर्ट घालणे त्वरित बंद कर.'

स्टायरिसचं डिविलियर्सला चॅलेंज

यावर स्टायरिस यांनी मात्र डिविलियर्सला दुसरी अट घातली. त्यांनी म्हटले की 'जर डिविलियर्स सांगत आहे की मी हा शर्ट घातणे बंद केले पाहिजे, तर आता मी डिविलियर्सलाही चॅलेंज देणार आहे. मी बेंगळुरूच्या पुढच्या सामन्यांसाठी त्यांची जर्सी घालणे बंद करेल, पण डिविलियर्सने एकदातरी चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालायला पाहिजे. तो प्लेऑफवेळी येणार आहे.'

यावेळी या शोमध्ये स्टायरिस यांच्यासह ओएन मॉर्गनही होता. त्यानेही या चॅलेंजला सहमती दाखवली. दरम्यान आता डिविलियर्स खरंच चेन्नईची जर्सी घालणार का हे पाहावे लागणार आहे.

बेंगळुरूचा मार्ग खडतर

दरम्यान बेंगळुरूने 7 पैकी 6 सामने पराभूत झालेले असल्याने त्यांच्यासाठी पुढील मार्ग खडतक झाला आहे. त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आगामी सातही सामन्यात विजयासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आता आणखी एक पराभव त्यांना महागात पडू शकतो. कारण आता बेंगळुरू प्ले-ऑफच्या शर्यतीतूनही लवकर बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT