IPL 2023 
IPL

IPL 2023: IPLचा पहिला सामना रद्द? गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यावर काळे ढग

आयपीएलचा १६ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटविश्वातील खेळाडूंसाठी आणि जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींसाठी सर्वांत उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएलचा १६ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यावर काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांची पहिल्याच दिवशी निराशा होणार. (Ahmedabad Weather Update Chennai Super Kings vs Gujarat Titans match 1 IPL 2023 )

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. त्याआधी वाईट बातमी समोर आला आहे.

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र, सामन्यावर पावसाचे दाट संकेत आहेत. काल 30 मार्च रोजी संध्याकाळी उशिरा अहमदाबाद आणि स्टेडियमच्या आसापासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरु होण्याआधी गुजरातचे खेळाडू हे सराव करत होते.

मात्र पाऊस आल्याने खेळाडू आडोशाला निघून गेले. गुजरात टायटन्सने पावसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गुजरातचा कोच आशिष नेहरा पावसाची मजा घेताना दिसतोय.

त्यामुळे सामन्याच्यावेळी पाऊस येणार का अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादमध्ये तापमान हे 29 ते 32 अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. पण 30 मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे चाहत्यांच्या मनात सामना रद्द होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

Tiger Attack: वाघाने चिमुरड्याला जबड्यात पकडून नेले, बहीण वाचली, पाळण्यातला भाऊ दगावला; भंडाऱ्याच्या तिर्रीची घटना

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Latest Marathi News Live Update: ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभाही गाजणार

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

SCROLL FOR NEXT