Ajinkya Rahane got only base price by Kolkata knight riders esakal
IPL

IPL Auction 2022: रहाणेसाठी केकेआरचे 'मै हु ना' ; पुजारा अभी कतार मैं हैं!

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलच्या मेगा लिलावातील (IPL Mega Auction 2022) दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमच्या नावने बोली लागण्यास सुरुवात झाली. हैदराबादने फॉरेन प्रेम दाखवत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. त्यानंतर अंजिक्य रहाणेचाही (Ajinkya Rahane) नंबर आला. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अंजिक्यवर शाहरुखच्या केकेआरने (Kolkata Knight Riders) त्याला 1 कोटी देऊन आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. दुसरीकडे 50 लाख मूळ किंमत असणारा पुजारा (Cheteshwar Pujara) अनसोल्ड राहिला. मागच्या वेळी चेन्नई सुपर किंग्जने त्याला मूळ किंमतीत खरेदी केले होते. सध्याच्या घडीला आयपीएल लिलावाचा दुसरा दिवस भावनिक निर्णय घेण्याचा नाही. प्रत्येक फ्रँचायझीला खूप विचार करुन खेळाडूवर बोली लावायची आहे. त्यामुळे त्यामुळे प्रत्येकजण विचारपूर्व निर्णय घेताना दिसते.

कर्णधार अजिंक्य रहाणे व उपकर्णधार चेतेश्‍वर पुजारा (cheteshwar pujara) यांना पहिल्या कसोटीत आपला ठसा उमटवता आलेला नाही. गेल्या वर्षभरात दोघांनाही प्रतिमेला साजेशी कामगिरीही करता आलेली नाही.

अजिंक्य रहाणेला २०२१ मध्ये पार पडलेल्या २१ कसोटींमध्ये फक्त ४११ धावाच फटकावता आलेल्या आहेत. यादरम्यान त्याने अवघ्या १९.५७ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. चेतेश्‍वर पुजाराची आकडेवारीही फारशी चांगली नाही. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये या वर्षी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून सहा डावांमध्ये फक्त १३३ धावा निघाल्या आहेत. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यामधील इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत त्याने दोन अर्धशतकांसह २२७ धावा केल्या. भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियन्सशिपच्या अंतिम फेरीच्या लढतीत त्याला २३ धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT