Andre Russell Record X/IPL
IPL

IPL 2024: रसेलचं वादळ घोंगावलं! 7 षटकार ठोकत रचला इतिहास, 'युनिवर्स बॉस' गेललाही टाकलं मागे

Andre Russell: आंद्रे रसेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तब्बल 7 षटकार मारत आयपीएलमध्ये ऐतिहासिक विक्रम केला आहे.

Pranali Kodre

Andre Russell Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कोलकाताने 4 धावांनी सहज विजय मिळवला.

या सामन्यादरम्यान कोलकाताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात 14 व्या षटकात रसेल आठव्या क्रमांकावर कोलकाताकडून फलंदाजीला उतरला होता. त्याने आक्रमक खेळताना 25 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. खेळीत त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. त्यामुळे त्याने आयपीएल कारकिर्दीत 200 षटकार पूर्ण केले.

त्याने 200 षटकार पूर्ण करण्यासाठी केवळ 1322 चेंडूंचा सामना केला. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत 200 षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

गेलने 1811 चेंडूत आयपीएलमध्ये 200 षटकार पूर्ण केले होते. त्यामुळे रसेलने गेलपेक्षा तब्बल 489 चेंडू कमी खेळत 200 षटकार पूर्ण केले.

रसेलने 19 व्या षटकात्या शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारविरुद्ध षटकार ठोकत या विक्रमाला गवसणी घातली. दरम्यान, रसेल आयपीएलमध्ये 200 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा एकूण नववा फलंदाज आहे.

सर्वात कमी चेंडूत 200 षटकार मारणारे खेळाडू

  • 1322 - आंद्रे रसेल

  • 1811 - ख्रिस गेल

  • 2055 - कायरन पोलार्ड

  • 2790 - एबी डिविलियर्स

  • 3126 - एमएस धोनी

  • 3798 - रोहित शर्मा

कोलकाताचा रोमांचक विजय

दरम्यान, कोलकाताकडून रसेल व्यतिरिक्त फिल सॉल्टनेही अर्धशतक करताना 40 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्यामुळे कोलतानाने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्या. हैदराबादकडून टी नटराजनने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 7 बाद 204 धावाच करता आल्या. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने 29 चेंडूत 8 षटकारांसह 63 धावांची खेळी केली. कोलकाताकडून हर्षित राणाने 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT