Andre Russell Dances With Ananya Panday sakal
IPL

Viral Video : 'लुट-पुट गया...' आंद्रे रसेलसोबत अनन्या पांडेचा जबरदस्त डान्स! सोशल मीडियावर 'त्या' पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Andre Russell Dances With Ananya Panday : कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले.

Kiran Mahanavar

Andre Russell Dances With Ananya Panday : कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. केकेआर संघाने 10 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या विजयानंतर केकेआर संघाने धमाल पार्टी केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो या विजयाचा आनंद साजरा करताना जोमात डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रसेल बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डान्स करताना दिसत आहे.

आंद्रे रसेल अनन्या पांडेसोबत शाहरुख खानच्या डंकी चित्रपटातील 'लूट पुट गया' या गाण्यावर जबरदस्त नाचताना दिसत आहे. रसेलचा सहकारी रमणदीप सिंग आणि केकेआरचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडितही याच गाण्यावर नाचताना दिसतात. कोलकाताला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्यात आंद्रे रसेलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या हंगामात त्याने 15 सामन्यात 222 धावा केल्या आणि 19 बळीही घेतले.

अनन्या ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे आणि केकेआरला सपोर्ट करण्यासाठी ती नेहमीच स्टेडियममध्ये येते. अनन्या आणि शाहरुखची मुलगी सुहाना खान खूप जवळच्या मैत्रिणी आहेत, दरम्यान, केकेआरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रमणदीप, वरुण चक्रवर्ती आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर 'देसी बॉयज' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT