IPL

Apple चे सीईओ टीम कुक DC vs KKR सामना पाहून भारावले; म्हणाले...

DC vs KKR सामना पाहून टीम कुक भारावले.

धनश्री ओतारी

आयपीएलच्या १६ व्या सीझनमध्ये 28 वा सामना पाहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मात्र, चर्चा सुरु आहे ती म्हणजे अॅपलचे सीईओ टीम कुक यांची. भारतातील क्रिकेट पाहून टीम कुक भारावले. क्रिकेटचं किती महत्त्व आहे हे मला आत्ता कळलं. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. (Apple CEO Tim Cook In Attendance At DC-KKR IPL 2023 Game )

दोन्ही संघामधील सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. यावेळी, अॅपलचे सीईओ टिम कुक बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्यासोबत दिल्लीत आयपीएल मॅच पाहताना दिसले. भारतातील दुसऱ्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केल्यानंतर, टीम कुक IPL सामन्याचा आनंद घेताना दिसले.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, 'यापूर्वी कधीही मी असं वातावरण पाहिल नाही. क्रिकेटचं किती महत्त्व आहे हे मला आत्ता कळलं' अशी प्रतिक्रिया टीम कुक यांनी व्यक्त केली.

यापूर्वी त्यांनी २०१६ मध्ये भारताला भेट देण्यासाठी आले होते त्यावेळेस अभिनेत संजय दत्तसोबत आयपीएल एन्जॉय केली होती. टीम कूक यांनी ग्रीन पार्क स्‍टेडियमवर पहिल्यांदा आयपीएलचा सामना एन्जॉय केला.

कोलकाता नाईट रायडर्सचे 128 धावांचे माफक आव्हान पार करताना देखील दिल्लीची हवा टाईट झाली होती. केकेआरने दिल्लीचे 6 फलंदाज बाद करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. अखेर अक्षर पटेलने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT