Appointed as Vidarbha umpire esakal
IPL

IPL 2022 मध्ये आता विदर्भाची 'पंच'गिरी

२६ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलसाठी पंच म्हणून नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बीसीसीआयच्या पॅनलवर असलेले विदर्भाचे क्रिकेट पंच उल्हास गंधे व नितीन पंडीत यांची येत्या २६ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलसाठी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी रणजीपटू असलेले गंधे हे आयपीएलमध्ये सहाव्यादा, तर पंडीत चौथ्यांदा पंच म्हणून काम पाहणार आहेत. आयपीएलमध्ये गंधे एकूण १२ सामन्यांमध्ये पंचगिरी करणार आहेत. यापैकी सात सामन्यांमध्ये ते मैदानावरील पंच, तीन सामन्यांमध्ये तिसरे पंच आणि दोन सामन्यांमध्ये चौथे पंच म्हणून काम पाहणार आहेत. तर पंडीत सहा सामन्यांमध्ये मैदानावरील पंच आणि तेवढ्याच सामन्यांमध्ये चौथे पंच राहणार आहेत.

आतापर्यंत ८० पेक्षा अधिक प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये पंचगिरी करणारे गंधे यांना देशविदेशातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरीचा अनुभव आहे. त्यांनी महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसह कसोटी व वनडेमध्ये चौथे पंच म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय घरगुती दुलीप करंडक, चॅलेंजर ट्रॉफी व देवधर करंडक स्पर्धेतही त्यांनी पंच म्हणून यशस्वीरित्या भूमिका बजावली आहे.

पंडीत यांनीही ७४ टी-२० व प्रथमश्रेणी सामन्यांसह इंग्लंड, न्यूझीलंड व द. आफ्रिका अ संघांच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे.

नियुक्तीबद्दल गंधे यांनी बीसीसीआय, विदर्भ क्रिकेट संघटनेसह महालेखाकार प्रवीरकुमार, वरिष्ठ उपमहालेखाकार दिनेश मते व उपमहालेखाकार अक्षय खंडारे यांचे आभार मानले आहे. पंडीत यांनीही बीसीसीआय व व्हीसीएला धन्यवाद दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT