Arjun Tendulkar IPL 1st Wicket  esakal
IPL

Arjun Tendulkar : पहिल्या IPL विकेटनंतर अर्जुन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Arjun Tendulkar IPL 1st Wicket : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज आपला आयपीएलचा दुसरा सामना खेळला. आजच्या सामन्यात त्याने पहिल्या सामन्यापेक्षा चांगला मारा केला. त्याने 2.5 षटके टाकत 18 धावांमध्ये 1 विकेट घेतली. त्याने 6.40 च्या सरासरी धावा देत किफायतशीर गोलंदाजी केली. अर्जुन तेंडुलकरने जरी फार विकेट्स घेतल्या नसल्या तरी त्याच्या किफायतशीर गोलंदाजीचा इतर गोलंदाजांना विकेट्स घेण्यात फायदाच झाला. अर्जुनने 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद करत आपली पहिली आयपीएल विकेट घेतली.

अर्जुन तेंडुलकरने पहिली विकेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'आयपीएलची पहिली विकेट घेणे नक्कीच खास असते. मी माझ्या हातात काय करण्यासारखं आहे याच्यावरच लक्ष केंद्रीत केले होते. मी माझी योजना अंमलात आणली. आम्ही फलंदाजापासून लांब चेंडू फेकून मोठ्या बाऊंड्री लाईनचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. आम्ही फलंदाजाला मोठ्या बाऊंड्रीकडे फटके मारण्यास भाग पाडले.'

अर्जुन तेंडुलकर पुढे म्हणाला की, 'मी आज ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्यावर मी खूष आहे. मी कॅप्टन सांगेल त्यावेळी गोलंदाजी करण्यास तयार आहे. मी फक्त संघाच्या प्लॅनप्रमाणे गोलंदाजी करत माझे सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतोय. मी आणि वडील सचिन तेंडुलकर क्रिकेटबद्दल बोलत असतो. आम्ही रणनितीबाबत बोलतो. मी जो सराव करतोय तशीच कामगिरी करण्यासाठी ते मला प्रोत्साहित करत असतात. मी माझ्या रिलीजवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. मी गुड लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय जर चेंडू स्विंग झाला तर तो बोनसच! जर नाही झाला तरी काही फरक पडत नाही. '

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT