Sam Curran 
IPL

IPL 2023 : 'सामनावीर पुरस्कारासाठी मी नाही तर हा खेळाडू खरा दावेदार...' - सॅम करन

Kiran Mahanavar

IPL 2023 MI vs PBKS : आयपीएल 2023च्या 31व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करून मोसमातील चौथा विजय नोंदवला आहे. हा सामना अतिशय रोमांचक होता ज्यात पंजाब किंग्जने 13 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंजाब किंग्जचा स्टँड-इन कर्णधार सॅम करन आपल्या संघाच्या विजयाचा हिरो ठरला होता. सामनावीर म्हणूनही त्याची निवड करण्यात आली. मात्र यादरम्यान त्यांनी असे वक्तव्य केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

पंजाब किंग्जचा स्टँड-इन कर्णधार सॅम करन म्हणाला की, सामनावीर पुरस्कार मला मिळायला हवा होता असे वाटत नाही, मुंबई इंडियन्सला ज्या प्रकारे 13 धावांनी पराभूत केले त्याबद्दल तो त्याच्या गोलंदाजांना, विशेषतः अर्शदीप सिंगला द्यायला हवा होता. सॅम करनने या सामन्यात 29 चेंडूत 55 धावांची कर्णधार खेळी खेळली होती. पंजाब किंग्जने केवळ 83 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर सॅम करनच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने 20 षटकांत 214/8 अशी मोठी धावसंख्या उभारली.

सामन्यानंतर सॅम करन म्हणाला, मला वाटत नाही. हा पुरस्कार मला मिळावा, आमच्या वेगवान गोलंदाजांनी ज्या प्रकारे सामना संपवला, अर्शदीप आणि नॅथन अविश्वसनीय होते आणि फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.

तो पुढे म्हणाला, जेव्हा मी फलंदाजीला जायचो, तेव्हा मला स्वत:ला संधी द्यायची आहे हे मला माहीत होते. गेल्या सामन्यांमध्ये मी जरा घाई केली होती. पण आम्हाला एक लांब लाइन-अप मिळाली आणि आम्ही जितेशला धमाकेदार कामगिरी करताना पाहिले आणि आम्हाला माहित आहे की त्याच्याकडे कौशल्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT