IPL

Asia Cup: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अडचणीत, आता माघार घेतली तर बसणार २४ कोटींना फटका

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आशिया चषक स्पर्धेतून माघार घेण्याचा धोका पत्करू इच्छित नाही. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, जर पाकिस्तान या वर्षीच्या आशिया कपमध्ये खेळला नाही तर त्याला 3 दशलक्ष डॉलर (सुमारे 24 कोटी रुपये) चे नुकसान होऊ शकते. ही बाब तत्त्वांची असून गरज पडल्यास हे नुकसान भरून काढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सप्टेंबरमध्ये आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे, मात्र भारतीय संघ पाकिस्तान दौर्‍यासाठी तयार नाही. भारतीय संघ तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळू शकेल आणि उर्वरित सामन्यांचे आयोजन पाकिस्तान करेल असा प्रस्ताव पीसीबीने ठेवला आहे.

नजम सेठी म्हणाले की, जर आमचा प्रस्ताव मान्य झाला नाही तर आम्ही इतर कोणताही कार्यक्रम स्वीकारणार नाही आणि स्पर्धेत सहभागी होणार नाही. आम्ही आमचे होस्टिंग अधिकार सोडणार नाही. PCB चेअरमन म्हणाले की ICCची 80 टक्के कमाई भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून येते.

पीसीबीच्या अध्यक्षांनी कबूल केले की आशियाई क्रिकेट परिषदेने पीसीबीचा प्रस्ताव स्वीकारला तर आयसीसीवरही वर्ल्ड कपसाठी असाच प्रस्ताव ठेवण्याचा दबाव असेल. पाकिस्तानने भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला नाही तर आयसीसीसोबतचे संबंध बिघडतील यावरही सहमती दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT