IPL 2023 Ayush Badoni Hit Wicket 
IPL

IPL 2023 : गजब आउट! एकाच चेंडूवर आधी षटकार नंतर... व्हायचं तेचं झालं

Kiran Mahanavar

IPL 2023 Ayush Badoni Hit Wicket : इंडियन प्रीमियर लीगच्या या मोसमात सर्व काही पाहायला मिळत आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेलेला सामना श्वास रोखणारा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकणार हे कळत नव्हते. अखेर लखनौने बाजी मारली आणि सामना आपल्या नावे केला.

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाचे तीन दिग्गज विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धडाकेबाज अर्धशतकी खेळी खेळली. संघाने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. लखनौने शेवटच्या चेंडूवर विजयाचे लक्ष्य गाठले.

18.4 षटकात लखनौ संघाचा युवा फलंदाज आयुष बडोनीची विकेट गमावली. 24 चेंडूत 30 धावा केल्यानंतर तो ज्या प्रकारे बाद झाला ते आश्चर्यचकित करणारे होते. 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने थर्ड मॅन बाउंड्री शॉट मारला आणि चेंडू षटकारासाठी गेला. या तरुणाने खेळलेला शॉट अप्रतिम होता पण बॅट त्याच्या नियंत्रणात राहिली नाही आणि स्टंपला लागली. त्यामुळे ज्या चेंडूवर आयुष बडोनी षटकार मारणार होता, त्या चेंडूवर तो हिट विकेट होऊन परतला.

लखनौला शेवटच्या 6 चेंडूत 5 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर 1 धाव झाली, त्यानंतर मार्कवुड दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा तर चौथ्या चेंडूवर 1 धाव. आता 2 चेंडूत 1 धाव हवी होती. येथे जयदेव उनाडकटने आपली विकेट गमावली. शेवटच्या चेंडूवर आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी धाव घेत धावा पूर्ण करून संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT