bcci-chief-roger-binny-secretary-jay-shah 
IPL

BCCIचे अधिकारी झाले श्रीमंत, बोर्डाने घेतला मोठा निर्णय, मिळणार एवढी मोठी रक्कम!

BCCIच्या अधिकाऱ्यांवर दिवसाचा खर्च ८२ हजार! अन्...

Kiran Mahanavar

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंवर नोटांचा पाऊस पाडला आहे. अशा स्थितीत बीसीसीआयचे अधिकारी यापासून कुठे दूर राहतील. बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्वत:साठी अशी व्यवस्था केली आहे, ज्याच्या अंतर्गत तेही खूप श्रीमंत होतील. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बीसीसीआयच्या बैठकीनुसार परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रतिदिन 82 हजारांपर्यंत वेतन दिले जाईल.

बीसीसीआयचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांना बोर्ड विशेष सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक परदेश दौऱ्यासाठी या चार उच्च अधिकाऱ्यांना प्रतिदिन 82 हजार रुपये दिले जाणार आहेत. बीसीसीआयच्या प्रत्येक बैठकीसाठी या अधिकाऱ्यांना बोर्डाकडून 40,000 रुपये मिळतील.

याशिवाय बोर्ड या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रथम श्रेणीच्या विमान प्रवासाची तिकिटेही उपलब्ध करून देणार आहे. परदेशात जाणाऱ्या या बीसीसीआय अधिकाऱ्यांना बोर्ड दररोज एक हजार अमेरिकन डॉलर्स देणार आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यांना दिलेला हा भत्ता ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, BCCI अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांना देशातील बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी बिझनेस क्लासच्या प्रवासाव्यतिरिक्त दररोज 40,000 रुपये दिले जातील. दुसरीकडे कार्यालयीन कामासाठी जाताना या अधिकाऱ्यांना प्रतिदिन 30 हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय हे अधिकारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये सूट रूम बुक करू शकतात. आयपीएलच्या अध्यक्षांनाही याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT