Nitish Rana Fined 
IPL

IPL 2023 : नितीश राणा मैदानावरच अंपायरशी भिडला! 24 तासात BCCIने घेतली ॲक्शन, खेळण्यावर घालणार बंदी

सामन्यात नितीश राणाने केली मोठी चूक...

Kiran Mahanavar

Nitish Rana Fined : नितीश राणाच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा आहे. संघाने 4 वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जचा 13व्या सामन्यात 6 गडी राखून पराभव केला. पण या सामन्यात नितीश राणाने मोठी चूक केली. यानंतर बीसीसीआयने 24 तासांच्या आत त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे

टी-20 लीगच्या 16 व्या मोसमातील 61 व्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील CSK संघाने प्रथम खेळताना 6 विकेट गमावत 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने 9 चेंडू बाकी असताना 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. नितीश 57 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी रिंकू सिंगनेही 54 धावांची धडाकेबाज खेळी केली.

स्लो ओव्हर रेटमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला CSK विरुद्ध दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधार नितीश राणाला 24 लाख रुपये तर इतर खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25-25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी डावाच्या 20व्या षटकात नितीश पंचांशी वाद घालताना दिसला होता. संघाला वेळेवर 20 षटके टाकता आली नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना 5 ऐवजी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी होती.

याआधी 8 मे रोजी कोलकात्यालाही पंजाब किंग्जविरुद्ध संथ षटकांमुळे दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर नितीश राणा यांच्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नियमानुसार, तिसऱ्यांदा अशी चूक केल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. दुसऱ्या चुकीमुळे त्याच्यावरील दंडाची रक्कम 24 लाख रुपये झाली आहे.

KKR बद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत लीग फेरीचे 13 सामने खेळले आहेत. संघ 12 गुणांसह गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत जर संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला तर नितीशची बंदी संघाला जड जाऊ शकते.

आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल, मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT