MS Dhoni to convince Stephen Fleming sakal
IPL

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

Team India Head Coach News : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता टीम इंडियासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे.

Kiran Mahanavar

Team India Head Coach News : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता टीम इंडियासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याशीही संपर्क साधला आहे. आणि फ्लेमिंग हे बीसीसीआयची पहिली पसंती असल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर आता बीसीसीआय फ्लेमिंगला मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी एमएस धोनीची मदत घेण्याचा विचार करत आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग 2009 पासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली आणि फ्लेमिंगच्या कोचिंगमध्ये चेन्नईने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

फ्लेमिंगचे भारतीय खेळाडूंशी असलेले संबंधही त्याला अनुकूल आहेत. त्यामुळे तो बीसीसीआयची पहिली पसंती राहिला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, फ्लेमिंग यांनी 2027 पर्यंतच्या कराराबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि त्यासाठी त्यांनी नकार दिला होता.

एमएस धोनी आणि फ्लेमिंग हे आयपीएलच्या सुरुवातीपासूनच खूप जवळ आहेत. अशा स्थितीत धोनीपेक्षा फ्लेमिंगला कोणीही पटवून देऊ शकत नाही. ज्याचा बीसीसीआय विचार करत आहे. धोनी आणि फ्लेमिंगमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगली मैत्री असल्याचं म्हटलं जातं.

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा राहुल द्रविडला टीम इंडियाचा कोच होण्यासाठी विचारण्यात आले तेव्हा त्यानेही नकार दिला होता. पण नंतर राहुलने निर्णय घेतला. अशा परिस्थितीत बीसीसीआयला आता आशा आहे की धोनीने फ्लेमिंगशी चर्चा केली तर कदाचित तो टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास तयार होईल.

आयपीएलमध्ये सीएसके व्यतिरिक्त स्टीफन फ्लेमिंग हे यूएसएच्या मेजर लीग क्रिकेट, दक्षिण आफ्रिकेच्या टेक्सास सुपर किंग्ज आणि जॉबर्ग सुपर किंग्सचे प्रशिक्षक आहेत. याशिवाय फ्लेमिंग द हंड्रेडमधील सदर्न ब्रेव्हचे प्रशिक्षकही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT