Team India sakal
IPL

Team India : बीसीसीआयचा मोठा निर्णय! WTC फायनलनंतर टीम इंडियाला मिळणार नवीन 'बॉस'

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली पण गेल्या वेळी...

Kiran Mahanavar

Team India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाला WTC फायनलनंतर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआय मोठी घोषणा करू शकते.

फेब्रुवारी महिन्यात स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्माला बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ताच्या पदावरून हकलपट्टी केली. स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि फिटनेससाठी इंजेक्शनसह अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी बीसीसीआय मुख्य निवडकर्त्याची नियुक्ती करू शकते.

माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन शर्माला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. मात्र नंतर त्याला कायम ठेवण्यात आले. चेतन शर्मा मुख्य निवडकर्ता असताना टीम इंडियाची कामगिरीही अत्यंत खराब होती. चेतन शर्मा यांच्या कार्यकाळात टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पण गेल्या वेळी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत यावेळी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हे जेतेपद आपल्या नावावर करायचे आहे. टीम इंडियाने 2013 पासून एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे टीम इंडियासाठी ही फायनल खूप खास असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT