BCCI president Sourav Ganguly Ahmedabad and Kolkata IPL 2022 Play Off
BCCI president Sourav Ganguly Ahmedabad and Kolkata IPL 2022 Play Off esakal
IPL

IPL Play Off | BCCI अध्यक्ष, सचिवांनी 'प्ले ऑफ' घेतले अर्धे-अर्धे वाटून

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) शनिवारी बोर्डाची बैठक झाल्यानंतर आयपीएलच्या प्ले ऑफ (IPL 2022 Play Off) सामन्याबद्दलची माहिती दिली. यंदाच्या हंगामातील प्ले ऑफचे सामने हे 24 मे ते 28 मे या दरम्यान आयोजित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे आधी हे सामने फक्त अहमदाबादमध्ये होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता हे सामने कोलकाता (Kolkata) आणि अहमदाबादला (Ahmedabad) होणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली हे कोलकाता शहरातीलच आहेत. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) हे गुजरातचे आहेत. त्यामुळे या दोघांनी प्ले ऑफ सामन्यांची समान वाटणी करून घेतली असल्याचे दिसते.

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने सांगितले की, प्ले ऑफ मधील एलिमनेटरचे सामने 24 आणि 26 मेला कोलकाता येथे खेळवले जातील. तर प्ले ऑफचा दुसरा सामना 27 आणि फायनल 29 मेला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. याचबरोबर सौरभ गांगुलीने या सर्व सामन्यात प्रेक्षकांची पूर्ण क्षमतेने उपस्थिती असेल असेही सांगितले. तसेच महिला चॅलेंजर सिरीज ही 24 मे ते 28 मे दरम्यान लखनौच्या इकाना स्टेडियमवर होणार आहे.

सौरभ गांगुली म्हणाला की, 'पुरूषांच्या प्ले ऑफ हे कोलकाता आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. तर 22 मे ला साखळी सामने संपल्यानंतर होणाऱ्या सामन्यांसाठी मैदानात पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT