Bombay HC notice to Prithvi Shaw in selfie row esakal
IPL

IPL सुरू असतानाच पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या; मुंबई कोर्टाने दिले आदेश

आयपीएलदरम्यान पृथ्वी शॉला न्यायालयाकडून मोठा झटका

धनश्री ओतारी

क्रिकेट विश्वात आयपीलचा धुमाकूळ सुरु आहे. मात्र, दुसरीकडे पृथ्वी शॉ अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शॉला नोटिस पाठवत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ( Bombay HC notice to Prithvi Shaw in selfie row )

क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुन्सर सपना गिल या दोघांमधील वाद सध्या चर्चेत आहे. दोघांत झालेल्या वादात पृथ्वी शॉच्या तक्रारीनं अडचणीत आलेल्या सपना गीलने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

तसेच आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करावी, अशी मागणी तिने केली होती. या मागणीची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून क्रिकेटर पृथ्वी शॉसह फिर्यादी आणी तपास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच याप्रकरणी उत्तर सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

पृथ्वी शॉ आपल्या मित्रांसोबत 15 फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. यावेळी सपना गिलही आपल्या मित्रांसोबत तेथे उपस्थित होती. सपना आणि तिच्या मित्रांनी पृथ्वीसोबत एक सेल्फी घेतला. मात्र पुन्हा सेल्फी घेण्यासाठी आले असता पृथ्वीने नकार दिला. आपण डिनर करत असल्याचे सांगत पृथ्वीने नकार दिला.

यानंतर हॉटेलबाहेर येताच सपनाने पृथ्वीसोबत हुज्जत घातली. या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यानंतर पृथ्वीच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलीस ठाण्यात सपना गिलसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर 17 फेब्रुवारीला सपना गिलला अटक झाली होती. आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय. शॉनेच तिच्यावर आणि तिच्या मित्रांवर हल्ला केल्याचा आरोपी सपना गिलने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT