Wankhede Groundmen in 5 star Hotel
Wankhede Groundmen in 5 star Hotel  
IPL

कॅडबरीचं गोड गिफ्ट! ग्राऊंड्समनसाठी केले 5 स्टार हॉटेल बुक

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलचा (IPL 2022) तब्बल दोन महिने चालणारा ताम झाम हा स्टार खेळाडू, धनाड्य फ्रेंचायजी यांनी भरून गेलेला असतो. मात्र हा सगळा मनोरंजनाचा डोलारा असंख्य राबणाऱ्या हातावर पेललेला असतो. ग्राऊंड्समन (Groundmen) हे त्यामधीलच एक अविभाज्य भाग आहेत. याच ग्राऊंड्समनचा कॅडबरी (Cadbury) कंपनीने त्यांच्या अविरत सेवेबद्दल त्यांचा गौरव केला आहे. त्यांना ग्राऊंडमधील एका कोपऱ्यातून थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (5 Star Hotel) नेऊन ठेवले. याबाबत वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium) ग्राऊंड्समन वसंत मोहिते यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत कृतज्ञता व्यक्त केली.

यंदाच्या आयपीएल हंगामात कॅडबरीने ग्राऊंड स्टाफला 5 स्टार हॉटेलमधील रूम, याचबरोबर प्रसिद्ध डिझायनर मसाबाने डिझाईन केलेले कपडे जेवण आणि ग्राऊंड पर्यंत ये जा करण्यासाठी बसची सुविधा दिली आहे. याबाबत बोलताना ग्राऊंड स्टाफचे सदस्य वसंत मोहिते म्हणाले की, 'हे अद्भूत आहे. आम्हाला हंगाम सुरू होण्यापूर्वी 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यास मिळणार अशी चर्चा कानावर येत होती. मात्र आम्हाला त्यावर विश्वास बसत नव्हता. एकेदिवशी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आम्हाला सांगितले की, कॅडबरी यंदाच्या हंगामात आमच्या राहण्या खाण्याची सोय करणार आहे. त्यांनी आम्हाला आयपीएलच्या दोन महिन्यासाठी कपडे आणि जेवण देखील दिले आहे.'

मरीन ड्राईव्हच्या काठावर असणाऱ्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसून अरबी समुद्राचा आनंद घेणाऱ्या वसंत मोहिते यांना आपले जुन्या डासांनी फोडून खाल्लेल्या आयपीएल सामन्यादरम्यानच्या रात्री आठवल्या. यबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आयपीएलचा सामना कायम उशिरा संपायचा त्यामुळे आम्हाला आमचे काम आवरून घरी जाणे शक्य व्हायचे नाही. अशा वेळी आम्ही वानखेडेच्या विठ्ठल दिवेचा स्टँडखाली असलेल्या एखा छोट्या रूममध्ये झोपायचो. तेथे रात्री डास इतके त्रास देत होते की झोपच पूर्ण व्हायची नाही. त्यात रात्री इतका उशीर होत असल्याने ट्रेन देखील मिळायच्या नाहीत. ज्यावेळी सामना नसायचा त्यावेळी आम्ही सकाळी 9 वाजता पोहचायचो आणि संध्याकाळी 6 ला सुट्टी व्हायची. मात्र सामन्याच्या दिवशी आम्ही लवकर येत होतो आणि उशिरापर्यंत काम करत होतो. आम्हाला एमसीए त्याचे डबल पैसे देत होती.'

मोहितेंनी जरी ते 5 स्टार हॉटेलमध्ये गेले असले तरी त्यांच्या अडचणीत काही कमी झाल्या नसल्याचे सांगितले. त्यांना सुरूवातीला रूममधील स्विच शोधण्यास खूप वेळ लागला. त्यांना काही केल्या लाईट लावता येत नव्हती. अखेर मोहितेंना चांगली झोप लागली. मात्र रूममधील गादी खूपच मऊ होती असे मोहिते सांगतात.

वसंत मोहिते यांचे सहकारी नितीन मोहिते यांनी सांगितले की, 'आता ड्रेसिंग रूममध्ये चालत जाताना वेगळेच वाटते. आता आम्हाला स्वतःची बस आहे. दिलेल्या या उत्तम सुविधेसाठी आभार व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. आम्ही फक्त त्यांना थँक यू म्हणू शकतो.'

विशेष म्हणजे खेळाडू कायम ग्राऊंड्समनला थँक यू म्हणातात. वसंत मोहिते यांनी याबाबतचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, 'मोहम्मद कैफने दोन वर्षापूर्वी येऊन मिठी मारली होती. त्यावेळी मोहम्मद कैफ आपल्या समालोचन सहकाऱ्याला म्हणाला होता की आम्ही ज्यावेळी 19 वर्षाचे होतो त्यावेळी यांनी आमची सेवा केली आहे.' मात्र मोहितेंनी नवीन पिढीतील खेळाडू इतकी आपुलकी दाखवत नाहीत अशी खंत बोलून दाखवली. ते त्यांच्याच विश्वात मग्न असतात. वसंत मोहिते हे 90 च्या दशकापासून वानखेडेवर ग्राऊंड स्टाफचे काम करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT