Kolkata Knight Riders | rapper drake Sakal
IPL

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

IPL 2024, KKR vs SRH: एका प्रसिद्ध रॅपरने कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकेल, यावर बेट लावली आहे.

Pranali Kodre

IPL 2024, KKR vs SRH Final: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळला जाणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात हा सामना खेळला जाणार आहे.

या सामन्यानंतर आयपीएल 2024 चा विजेता संघ मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ही चर्चा फक्त भारताच नाही, जगभरातील अनेक देशांमध्ये आहे.

आता अशी माहिती मिळत आहे की कॅनडाचा तीनवेळचा ग्रॅमी पुरस्कार विजेता रॅपर ड्रेकने पहिल्यांदाच क्रिकेटवर बेट (सट्टा) लावली आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकेल, यावर बेट लावली आहे. भारतात जरी बेटिंग वैध नसले, तरी जगभरातील अनेक देशांमध्ये बेटिंगला परवानगी आहे.

ड्रेकने कोलकाताच्या जिंकण्यावर 250,000 डॉलरची बेट लावली आहे. याचा स्क्रिनशॉट देखील त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. 37 वर्षीय ड्रेकने एखाद्या खेळावर बेट लावण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्याने यापूर्वीही अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी अशा अनेक खेळांवरही बेट लावली आहे.

ड्रेक हा ऑनलाईन क्रिप्टोकरन्सी कॅसिनो स्केक डॉट कॉमचा ब्रँड अँबेसिडर आहे. तो ब्रँड अँबेसिडर झाल्यापासून त्याने अनेक मोठ्या बेट लावल्या आहेत. काही बेट त्याला फायदेशीर ठरल्या आहेत, तर काहींनी त्याचं मोठं नुकसानही केलं आहे.

दरम्यान, कोलकाताने आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले, तर त्याला साधारण ४ लाख 25 हजार डॉलरचा फायदा होऊ शकतो.

कोलकाता - हैदराबाद आमने सामने

कोलकाताने आयपीएल 2024 स्पर्धेत साखळी फेरीमध्ये 14 सामन्यांमधील 9 सामने जिंकले होते, तर 3 सामने पराभूत झाले होते. तसेच त्यांचे 2 सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यामुळे त्यांनी 20 पाँइंट्ससह पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता.

हैदराबादने साखळी फेरीत 14 सामन्यांमधील 8 सामन्यांत विजय मिळवला होता, तर 5 सामन्यांत पराभव स्विकारला होता. तसेच त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यांनी 17 पाँइंट्ससह पाँइंट्स टेबलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता.

पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्याने या दोन संघात क्वालिफायर-1 सामना झाला होता, ज्यात कोलकाताने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

क्वालिफायर-1 मधील पराभवानंतर हैदराबादने क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता अंतिम सामना कोलकाता आणि हैदराबाद संघात रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT