esakal
IPL

मी इतकी मेहनत का केली...विजयानंतर कॅप्टन पांड्या म्हणाला

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएल चॅम्पियन ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले.

धनश्री ओतारी

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएल चॅम्पियन ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवत आपले पहिले वहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. या विजयानंतर हार्दिक पांड्याने प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. मी इतकी मेहनत का केली हे मला दाखवायचे होते आणि तो हा दिवस आहे. अशी प्रतिक्रिया पांड्याने यावेळी व्यक्त केली.

या मोसमात 7.75 च्या सरासरीने 8 विकेट घेणारा पांड्या म्हणाला, 'मी कशासाठी खूप मेहनत केली हे मला दाखवायचे होते. आज तो दिवस माझ्या गोलंदाजीचा होता. या मोठ्या दिवसासाठी मी माझे सर्वोत्तम राखून ठेवलं होत.''

तसेच, संजू आऊट झाल्यावर मी दुसरा बॉल टाकला, मला समजले की तू अवघड लेन्थ टाकू शकतोस.

हार्दिक हा या हंगामात गुजरात टायटन्सचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. मोसमात 44.27 च्या सरासरीने 487 धावा करणारा हार्दिक या मोसमात नव्या भूमिकेत दिसला. भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्ससाठी फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या हार्दिकने मोसमातील बहुतांश प्रसंगी गुजरातसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली.

तुमचा स्ट्राइक रेट 160-170 आहे असे विचारल्यावर तो म्हणाला, 'या ट्रॉफीसाठी मी कोणत्याही दिवशी 160-170 स्ट्राइक रेट सोडू शकतो. संघ सर्वात महत्वाचा आहे. मी कोणत्याही संघासाठी खेळतो. माझ्यावर होणाऱ्या टीकेकडे मी कधी लक्ष देत नाही. जरी हंगाम माझ्यासाठी सर्वात वाईट निघाला आणि संघ जिंकला तरीही मी ते आनंदाने स्वीकारेन.

पांड्या म्हणाला, “मी आणि आशू पा म्हणजेच आशिष नेहरा सहमत झालो की आम्हाला नेहमीच पाच गोलंदाज खेळवायचे आहेत. जे बहुतेक प्रसंगी आमच्यासाठी सामने जिंकू शकतात. मी टी-20 क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिले आहे की हा फलंदाजांचा खेळ आहे, पण गोलंदाज तुम्हाला सामने जिंकायला लावतात. अशी प्रतिक्रिया पांड्याने विजयानंतर व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT