Pat Cummins | Sunrisers Hyderabad | IPL 2024 Sakal
IPL

SRH vs LSG: हैदराबाद बॅटिंग करताना खेळपट्टी बदलली? कॅप्टन कमिन्सनं दिलं भन्नाट उत्तर

Pat Cummins: आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 166 धावांचं लक्ष्य सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांनी 10 षटकांच्या आतच पूर्ण केलं होतं. यावर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनेही उत्तर दिलं आहे.

Pranali Kodre

Pat Cummins on SRH Win against LSG: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 57 वा सामना बुधवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात पार पडला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 10 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात लखनौला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 165 धावांपर्यंत पोहचताना संघर्ष करावा लागला होता. परंतु, हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड फलंदाजीला आल्यानंतर त्यांनी लखनौच्या गोलंदाजांना वरचढ होण्याची संधीच दिली नाही.

त्यांनी आक्रमक फलंदाजी करताना 166 धावांचे लक्ष्य अवघ्या 9.4 षटकातच पूर्ण केले. 10 षटकांच्या आतच धावांचा पाठलाग हैदराबादने केल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स खूश होता, त्याने अभिषेक आणि हेडचे भरभरून कौतुकही केले. विशेष म्हणजे बुधवारी कमिन्सचा 31 वा वाढदिवसही होता.

दरम्यान, सामन्यानंतर कमिन्स प्रेझेंटेशनमध्ये बोलायला आला होता. यावेळी त्याला गमतीने हर्षा भोगले यांनी प्रश्न विचारला की दुसऱ्या डावात खेळपट्टी बदलली होती का? त्यावर तोही गमतीने म्हणाला, 'कदाचीत ट्रेविस आणि अभिषेकने ती बदलली.'

तो पुढे त्या दोघांना काही सल्ला दिला होता का याबद्दल सांगताना म्हणाला, 'आम्ही त्यांना मोकळेपणाने खेळू दिले. ते दोन खेळाडू खूप सकारात्मक आहेत आणि मी एक गोलंदाज आहे, त्यामुळे त्यांना कोणताही सल्ला देणे माझ्यासाठी कठीण आहे.'

कमिन्स हेड आणि अभिषेकबद्दल बोलताना म्हणाला, 'ट्रेविस हेड गेल्या 2 वर्षांपासून असाच खेळतोय, तो अवघड क्षेत्रात फटकेबाजी करतो, कदाचीत तो खूप पारंपारिक खेळत नसेल, पण त्याच्या बॅटच्या मधोमध चेंडू येत आहे. अभिषेक फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजीचा चांगला सामना करू शकणारा अविश्वसनीय खेळाडू आहे.

कमिन्स पुढे म्हणाला, 'दोनच क्षेत्ररक्षक बाहेर असताना गोलंदाजांना त्यांच्याविरुद्ध खेळणे कठीण जाते. जेव्हा खेळपट्टी चांगली असते, तेव्हा मोठ्या धावा होत आहेत. जेव्हा फलंदाज लयीत असतात, तेव्हा त्यांची तोड शोधून काढणे गोलंदाजांना कठीण जात आहे. आमच्यासाठी हा हंगाम चांगला राहिलाय, पण 10 षटकांच्या आतच सामना जिंकणे अविश्वसनीय आहे.'

या सामन्यात हेडने 30 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 89 धावा केल्या, तसेच अभिषेकने 28 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने हा सामना सहज जिंकला.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने 20 षटकात 4 बाद 165 धावा केल्या. लखनौकडून आयुष बडोनीने 30 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी केली. तसेच निकोलस पूरनने 26 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेकल्या, तर कमिन्सने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT