पंजाबकडून राजस्थानला धक्का Sakal
IPL

IPL 2024 : पंजाबकडून राजस्थानला धक्का; सॅम करनची अष्टपैलू चमक

पंजाबचा हा पाचवा विजय ठरला. राजस्थानला मात्र पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी: इंग्लंडच्या सॅम करन याने आपण खेळत असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील अखेरच्या लढतीत पंजाब किंग्सला विजय मिळवून दिला. त्याने केलेल्या अष्टपैलू (नाबाद ६३ धावा, २/२४) खेळाच्या जोरावर पंजाबने प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्सवर पाच विकेट राखून मात केली. पंजाबचा हा पाचवा विजय ठरला. राजस्थानला मात्र पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थानकडून पंजाबसमोर १४५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. प्रभसिमरन सिंग (६ धावा), जॉनी बेअरस्टो (१४ धावा), रायली रुसो (२२ धावा), शशांक सिंग (०) यांना ठसा उमटवता आला नाही;

पण सॅम करन याने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ६३ धावांची खेळी साकारताना पंजाबला दमदार विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने पाच चौकार व तीन षटकार मारले. जितेश शर्माने २२ धावांची खेळी करीत त्याला उत्तम साथ दिली. सॅम करन आता टी-२० विश्‍वकरंडकाच्या तयारीसाठी मायदेशी रवाना होणार आहे.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या लढतीत राजस्थानच्या फलंदाजांना प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. जॉस बटलर मायदेशी रवाना झाला असून त्याच्याऐवजी सलामीला टॉम कॅडमोर याला संधी देण्यात आली. यशस्वी जयस्वाल (४ धावा), टॉम कॅडमोर (१८ धावा),

संजू सॅमसन (१८ धावा) यांच्याकडून निराशा झाली. रवीचंद्रन अश्‍विन (२८ धावा) व रियान पराग (४८ धावा) यांनी राजस्थानसाठी झुंज दिली. राजस्थानच्या संघाने २० षटकांत नऊ बाद १४४ धावा केल्या. पंजाबकडून सॅम करन, हर्षल पटेल व राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स - २० षटकांत ९ बाद १४४ धावा (रियान पराग ४८, रवीचंद्रन अश्‍विन २८, सॅम करन २/२४) पराभूत वि. पंजाब किंग्स - १८.५ षटकांत पाच बाद १४५ धावा (रायली रुसो २२, सॅम करन नाबाद ६३, जितेश शर्मा २२, आवेश खान २/२८)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

SCROLL FOR NEXT